नांदेड। नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कांकाडी येथील सत्य आई देवी नवरात्र महोत्सव निमित्ताने भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे व अधिका-यांनी भेट देऊन विधीवत पूजा व महाआरती केली आहे.
नवरात्र महोत्सव निमित्ताने नांदेड तालुक्यातील कांकाडी येथील सत्य आई देवी मंदिर देवस्थान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले,या देवी पुढे , शेकडो बकरयाचा बळी जायचा ,पशु हत्याची बळी प्रथा श्री संत तनपुरे महाराज पंढरपूरकर यांनी बंद करून देविला पुरण पोळीचा नैवेद्य सुरू केला असून गावकऱ्यांनी तुळशी माळा घालून पशुहत्या पासून गाव मुक्त केले आहे,पुढे ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिध्दीस आली, आजही प्राचिन काळापासून दर तिनं वर्षांला भरत असते, सुहासिनी,बाई लेकी पुरण पोळी नवैध अर्पण करतात व मनोकामना पूर्ण करतात, आजही दैविला सोने चांदी चे पाळणे वाहतात .
नवरात्र महोत्सव निमित्ताने २६ सप्टेंबर ते ४ आकटोबर पर्यंत महाआरती चे यजमान यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. २८ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी विधीवत पूजन करून महाआरती केली, यावेळी ऊपसिथीत मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायतचे संरपच शरद भवर,सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य सुदीन बागल , व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,नांदेड दक्षिण विधानसभा युवा सेना तालुका प्रमुख संतोष देशमुख ,तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश बागल,सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन प्रल्हाद पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष दशरथ पाटील बागल, बाळु वाघमारे,बाळू देशमुख,माधव कानोले,ऊतम पाटील बागल ,रावण वरताळे, साहेबराव कानोटे, भगवान येडे गुरूजी,लक्षमण भवर, मोतीराम कोणके,हारी पवार, व्यंकटी पवार, तानाजी भवर,माधव देशमुख,संदीप बागल,गणेश भव्य,बळी कानोलै, नारायण बिंगेवाड, ज्ञानेशवर कोणके, कैलास बागल,काळेशवर बागल यांच्या सह समस्त गावकरी मंडळी व नवरात्र महोत्सव पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
या नवरात्र महोत्सव निमित्ताने ग्रामीण भागातील महिलांसह नागरीक भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून भाविकांसाठी गावातील ग्रामस्थांसाठी दैनंदिन जेवणाची ची व्यवस्था करण्यात आली आहे.४ आक्टोबरला गावातुन पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.