नवीन नांदेड। गेल्या चार वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या तिरुपती बालाजी मंदिर येथील प्रसिद्ध असलेल्या वडा प्रसादाला श्री बालाजी मंदिर देवस्थान हडको च्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रसादाला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात मागणी महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातुन भक्तांची होणारी मागणी लक्षात घेत मंदिर विश्वस्त समितीने वाढत्या प्रतिसादामुळे मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.
तिरुपती बालाजी मंदिर तिरूमाला आंध्र प्रदेश येथील प्रसिद्ध असलेल्या वडा प्रसादाला मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर भाविक मोठ्या प्रमाणात मागणी करतात त्याच बरोबर बुंदीलाडू चीही भक्तांना आवड असल्याने त्याची मागणी मोठया प्रमाणात करण्यात आल्या नंतर गेल्या दोन वर्षांपासून हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे या प्रसादाला सुरुवात करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भक्त गणांनी मागणी करून गंगाळ सेवा चालू करण्यात आली प्रतिसाद मिळाला.
बालाजी मंदिर विश्वस्त समितीने गेल्या अनेक वर्षांपासून आचारी असलेल्या बालाजी आनेराय यांनी त्यांचा महिला व पुरुष यांच्या सोबत घेऊन जवळपास २० पुरुष व महिला यांच्या सहाय्याने चार दिवसांत ३ किवटंल वडा तयार करून दिला असून दसरा पर्यंत ७ किवटंल वडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले, वडा हा हिंग व कस्तुरी मेथी मिश्रण असलेला हा वडा प्रसाद म्हणून अनेक दिवस तो चांगला राहू शकतो व पचनास उपयुक्त असल्याने व चविष्ट दर्जाचे असल्यामुळे अनेकांनी मागणी केली ,या सोबत लाडू ,खिचडी ,चणा ,चित्रान्न ,साखर भात ,या गंगाळ मध्ये नवरात्र उत्सवात भक्तांची मोठ्या प्रमाणात मागणी असते ,प्रति नग वडा व बुंदीचा लाडू दहा रुपये असल्याने भाविक मोठया प्रमाणात गर्दी करीत आहेत.
याशिवाय मंदिर देवस्थानला अन्नदान व देणगी देणाऱ्या भाविक भक्तासाठी लाडू व गंगाळ देवस्थानच्या वतीने विनामूल्य देण्यात येत आहे ,भक्तांसाठी २० व्या ब्रम्होत्सव दसरा निमित्य विविध दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवहाण विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोंडवार ,उपाध्यक्ष विवेकानंद देशमुख,सचिव बाबुराव येरगेवार, कोषाध्यक्ष करणसिग ठाकूर,सहसचिव प्रकाशसिंह परदेशी, संस्थापक अध्यक्ष माणिकराव देशमुख ,संजीवन राजे ,अजय भंडारी ,गोवर्धन बियाणी ,सचिन नपाते, ,सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख व विश्वस्त पदाधिकारी यांच्या सह आचारी बालाजी आनेराय व त्यांचे विसजण सहकारी परिश्रम घेत आहेत.