डी.वाय.एफ.आय आणि एस.एफ.आय युवक विद्यार्थी संघटणा आक्रामक अन्यथा घेराव आंदोलन करणार
किनवट। नांदेड जिल्हातील विविध तालुक्यातील जि.प च्या ३३६ शाळा तथा किनवट तालुक्यातील ७१ शाळा बंद करण्याच्या प्रस्तावीत निर्णयाच्या विरोधात डी.वाय.एफ.आय आणि एस.एफ.आय या युवक आणि विद्यार्थी संघटणांनी जि.प शिक्षण अधिकारी नांदेड यांना गट शिक्षणधिकारी किनवट यांच्या मार्फत निवेदन दिले आसुन हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
शिक्षण उपसंचालक लातुर यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पट संख्याचे कारण पुढे आणुन पट संख्या कमी असलेल्या शाळांचे इतर शाळेत समायोजन करण्याचे प्रस्तावीत करण्यात आले अाहे , समायोजनाचे अंतर हे कमी जरी वाटत असले तर भोगोलीक दुष्टीकोणातुन हे अंतर प्रचंड लांब आहे ,किनवट, माहुर, सारख्या तालुक्यात डोगंर,दर्यात अनेक वस्ती,वाडी,तांड्यातील आदिवासी ,दलित, बहुजन वर्गातील विद्यार्थी जे शिक्षणापासुन कोसो दुर आहेत त्यांना कायमच शाळा बंद करुन शिक्षण क्षेञातुन बाहेर काढण्याचे हा निर्णय असुन हा हुकूमी निर्णय वापस घ्या असे मत यावेळी बोलतांना लोकशाहीवादि युवा फेडरेशन चे जिल्हा सचिव स्टॅलिन आडे यांनी व्यक्त केले.
तालुक्यात मांजरीमाथा, गोंडखेडी, वसंतवाडी,प्रेमनगर,दत्त नगर, मार्लागोंडा, तोटंबा अशा अनेक अतिदुरगम भागातील शाळा बंद होण्याचा अर्थ विद्यार्थी कायमच शिक्षण क्षेञातुन बाहेरे जातील तातडीने जिल्हातिल जि.प च्या ३३६ शाळा बंद करण्याचे प्रस्तावीत निर्णय रद्द न केल्यास हजारो विद्यार्थी, पालक,आणि जनतेला सोबत घेऊन बेमुदत घेराव आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनातुन देण्यात आले.
यावेळी स्टॅलिन आडे,प्रफुल कऊडकर ,ओकांर आञाम,आशीष भवरे,सचिन सिडाम, विवेक धुर्वे, अभिलाष कोडमेते व इतर विद्यार्थी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.