नवीन नांदेड। नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये तुप्पा ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा यांनी विविध ऊपकम व कार्यक्रम घेऊन आघाडीवर असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी डॉ.राजकुमार मुक्कामवार यांनी चष्मे वाटप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले.
तुप्पा ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा निमित्त प्राथमीक आरोग्य केंद्र तुप्पा येथे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार व ग्रामपंचायतचे सरपंच मदांकिनी यन्नावार यांच्या हास्ते वयोवृध्द नागरीकांना मोफत चष्मे वाटप कार्यक्रम दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा व ग्रामपंचायतच्या संयुक्त विध्यामाने विविध आरोग्य शिबिर राबविण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकुर/घुगे व जिल्हा आरोग्य आधिक डॉ.बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली "थोडेसे मायबापासाठी पण" या कार्यक्रमातील वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्या, तसेच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षिणता कार्यक्रम, राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा या अंतर्गत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यामध्ये ६० वर्ष वयोगटावरी नागरीकांची आणि माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा नावीन्यपूर्ण उपक्रमात आरोग्याची संबंधित, प्रसार- प्रचार आरोग्य संबंधित मार्गदर्शन,वयोवृद्धांची तपासणी कुटुंब, कल्याण शिबिरातील शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना पोषक आहार अंतर्गत फळे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास संबोधीत करतांना गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा व ग्रामपंचायत यांचे कौतुक करत म्हणाले की नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा असलेली सांगुन आरोग्य शिबिर घेऊन त्यांना चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी राठोड यांनी ही आरोग्य विषयक माहीती दिली,नेत्र चिकित्सक डॉ.एल.जी.चंदनकर यांनी नेत्ररोगा विषयी सदरील शिबिरात माहिती दिली.या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच मंदाकिनी यन्नावार,जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे,गुंटूरवार, मांजरमकर, ग्रामविकास अधिकारी कावळे ,विस्तार आधिकारी गिते, सौ संगीता वासेवार,डॉ.लता मुद्दीराज यांच्यासह तुप्पा ग्रामपंचायतचे आजी -माजी सदस्यांची उपस्थिती होती, तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. बालाजी राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांनी परीश्रम घेतले.