जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता -NNL

314 कोटी रुपयांच्या एकूण 255 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजूरी


मुंबई|
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा जादा दरडोई खर्च असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 2 व जिल्हा परिषदेच्या 253 अशा सुमारे 314 कोटी रुपयांच्या 255 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना आज मान्यता देण्यात आली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणेचे आयुक्त सी. डी. जोशी उपस्थित होते.

जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असून त्यांतर्गत 2024 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई 55 लिटर मानकाप्रमाणे शाश्वत व गुणवत्तापूर्ण पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या दि.29.06.2022 च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांसाठी दरडोई खर्चाचे सुधारीत निकष निश्चित करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी