चोरट्यांची चोरी करण्याची नवीन स्टाईल .. हायवेवरील चोरट्यांनी 'बार 'फोडले दारुचे बाँक्स व हार्डडिक्स लंपास -NNL


हदगाव, शे. चांदपाशा|
हदगाव शहरात व परिसरात आता चोरट्यांनी घरफोडी कडे दुर्लक्ष करित आता हायफाय 'चो-या' कडे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसुन येत आहे. अश्या चो-या करित असतांना माञ सीसीटीव्हि मधील हार्डडिक्स चोरुन नेत आहे अश्या घटनांची सहसा नोदी होत नसल्याने चोरट्यांची मजल वाढत असताना दिसुन येत आहे.

या बाबतीत माहीती अशी की, दि.4सप्टेबर राञी हदगाव शहराजवळ कौठा शिवारात नादेड नागपुर हायवे रोडवरील 'पाटील बीअर बार ' मधील इ.सामानाची नासधुस करुन सुमारे विविद प्रक्रच्या दारुचे बाँक्स पळविले ज्याची किमत पोलिस दप्तरी ५०पन्नास हजाराची करण्यात आलेली आहे. चोरट्यांनी तिथे आसलेले सीसीटीव्हीचे हार्डडिक्स पण न विसरता चोरुन नेले आहे. त्या राञी लक्ष्मीपूजन आसल्याने पाटील बार चे संचालक प्रसाद संजय जाधव हे घरीच होते. 

या बाबतीत अधिक माहीती घेतली असता यापुर्वी पण शहरा व तालुक्यात अश्या प्रकारच्या घटना घडलेल्या असल्याची चर्चा पण ऐकवायास मिळत आहे. पण संबंधितांनी या बाबतीत पोलिस स्टेशन मध्ये का नोद करत नाही या मागे कोणते कारण आहे. या बाबतीत ही सखोल चौकशी होणे अगत्याचे आहे कारण शहरात व परिसरात शासन मान्य देशी दारु व बिअर बार व रेस्टाँरेन्ट मध्ये भरपूर मध्यप्रेमी शहरात व तालुक्यात आढळून येतात हे त्याना पुरवठा ही भरपूर प्रमाणात होत आसतो आवर्जून ऊल्लेख करावा लागेल.

चोरट्यांनी स्टाईल बदलली .... हदगाव शहरात मागील महीन्याच्या चोरीच्या व दरोडा या घटनेचे अवलोकन केले तर काही शिक्षित तरुण ही दिसुन येतात काही प्रक्रण रफा -दफा तर काही प्रक्रणाची नोद होत आहे. फिर्यादी पण या बाबतीत अग्रेसर दिसुन येत नाहीत. परिणाम स्वरुप यावेळी पोलिस ही हतबल होताना दिसुन येतात. परिणाम स्वरुप तालुक्याचे विद्यमान आमदार यांचे आलिशान संपर्क कार्यालय सुद्धा फोडण्याचे चोरट्याचे धाडस होत आहे. यामुळे बहुतांशी नागरिक चोरीच्या तक्रारी करत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत आहे हेआवर्जुन उल्लेख करावा लागेल. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी