उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे सिध्दार्थ नगर, भोपाळवाडी, कलबंर ( बु.) ता.लोहा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि.४ ऑक्टोबर २०२२ रोज मंगळवारी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीचा तेरावा वर्धापन दिन सोहळा शांतीदूत बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आला आहे.
पंचशील ध्वजारोहण सकाळी ९.३५ वाजता मा.सौ.विमलबाई मन्नुसिंग ठाकुर ( सरपंच कलंबर बु.) यांच्या शुभहस्ते होणार आहे सकाळी दहा वाजता पु.भदंत यांचे धम्म प्रवचन होईल. यावेळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.बालाजी पाटील घोरबांड ( मा.जि.प.सदस्य कलंबर बु.) हे राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक मा.सौ.प्रणिताताई देवरे - चिखलीकर ( मा.जि.पसदस्या नांदेड ) यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.श्री.गणेश पाटील घोरबांड,मा.रावसाहेब पाटील भोपाळे ,( मा.सरपंच कलंबर बु) मा.सय्यद साहेब ( ग्रामसेवक) मा.सौ.स्वाती सुगावे ( तलाठी ) मा.नरेद्र गायकवाड ( उपसभापती पं.स. लोहा ) मा.मारोती पाटील घोरबांड,मा.बळीराम पाटील भोकरे ( म.गा.तं.मु.अध्यक्ष )
मा.चंद्रकांत रुद्रकंठवार ( पो.पा.भोपाळवाडी ) यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. शिवाभाऊ नरंगले ( वंचित बहुजन आ.जि.अध्यक्ष नांदेड ) मा.बालाजी परदेशी ( मा.जि.प.सदस्य कलंबर बु.) या.संतोषभाऊ गवारे,मा.मारोती कोठेवाड ( सरपंच कलंबर खु) मा.डि.के.कांबळे ,( सामाजिक कार्यकर्ते)मा.दिलीप पाटील भोपाळे ( ग्रा.प.सदस्य क.खु.) मा.पाटील ताटे ( छावा ता.अध्यक्षलोहा) मारुती करंडे (माजी सरपंच कलंबर बुद्रुक) मा. जीवन पाटील भोपाळे, राजीव भोकरे ,बाळू पाटील भोकरे, शिवाजी पाटील भोपळे, बालाजी कोटेवाड ,सुनील बोईनवाड ,दत्ता कांबळे, विठ्ठल कांबळे, शंकर पाटील घोरबांड, मारुती भोपाळे, चंदू भोपाळे , यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी एक वाजता गावातील प्रमुख रस्त्याने तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील चित्राची भव्य मिरवणूक निघणार आहे. रात्री ठीक नऊ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रमोद लोखंडे लातूर व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अशा चखे या दोन गायन पार्टीचा दणदणीत जंगी मुकाबला आयोजित केला आहे. तरी पंचक्रोशीतील या मंगलप्रसंगी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती शांतीदुत बुद्ध विहार सिध्दार्थ नगर संयोजक समिती व कार्यकारणी मंडळ भोपळवाडी कलंबर बुद्रुक तालुका लोहा यांनी केले आहे.