उस्माननगर, माणिक भिसे। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका ,संघटित व्हा ,संघर्ष करा ,हा मंत्र सांगितला. या मंत्राप्रमाणे बारूळ ता.कंधार येथील नामदेव रहाटे हे दोन्ही पायांनी अपंग व मागासवर्गीय पदवीधर अंशकालीन कर्मचारी अल्पशा मानधनवर तिस वर्ष सेवा केली .पण अद्यापही त्यांना कायमस्वरूपी केले नसल्यामुळे मोठी उपासमार होत असल्यामुळे त्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी शासन दरबारी तीस वर्षापासून संघर्ष करत आहेत.
शासनाकडे 1994पासुन ते आजतागायत कायमस्वरूपी नोकरी मिळण्यासाठी त्याना हक्क मागणीसाठी म्हणून राष्ट्रपती, पंतप्रधान, तसेच राज्य सरकारकडे अनेकवेळा नोकरीची मागणी केली. पण अद्यापही त्यांचा नोकरीचा विचार केला नसल्यामुळे त्यांची परिस्थिती फारचं बिकट आहे. उलट त्याना अाठ दिवस जेल भोगावी लागली त्यांना दोन मुली असून त्यांचे शिक्षण पोषण व लग्नाचा प्रश्र्न भेडसावत असल्यामुळे त्यांना आई-वडील भाऊ नसल्यामुळे दोन्ही पायाने आपण असले तरी पेंटिंग केल्यावर त्यांनी आपले पोट जगत आहेत बेरोजगारीत जिवन काढावे लागत आहे. त्यामुळे पून्हा शेवटचे ते शासनाकडे निवेदन नोकरी न मिळाल्यास दि.26 सष्टेबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषणास बसले आहे.
त्यामुळे या दोन्ही पायाच्या अपंग असलेल्या मागासवर्गीय नामदेव राहटे या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासनाकडून गेले तीस वर्षापासून कायमस्वरूपी नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष कधी संपणार व त्यांना कधी न्याय मिळणार मागील अनेक वर्षापासून सततचे उपोषण करूनही त्यांना त्याची शासनाकडून किंवा लोकप्रतिनिधी कडून दखल होत नाही. त्यामुळे त्यांनी शेवटचे आमरण उपोषण बसले असून त्यांची प्रकृतीही बरोबर नसल्यामुळे या मागासवर्गीय अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासनाकडून न्याय मिळावी अशी तालुक्यातून अनेक अंशकालीन कर्मचाऱ्याकडून व मागासवर्गीय संघटनेतून होत आहे.