नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने दुर्गा देवीची ग्रामीण व शहरी भागात उत्साहात स्थापना करण्यात आली तर कौठा , सिडको, हडको येथील ब्रम्होत्त्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, दुर्गादेवी स्थापण्याचा निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन ने शहरी व ग्रामीण भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
नवरात्र महोत्सव निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागात १३ तर शहरी भागात २९ ठिकाणी दुर्गादेवी ची उत्साहात मंडळांनी रात्री उशिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढुन व विधीवत पूजा करून स्थापणा केली असून दुर्गा देवीची स्थापना निमित्ताने मंडळाने मंडप, रोषणाई केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात,विश्वजित कासले, उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे,महेश कोरे,आंंनद बिचेवार,पाटील, बालाजी नरवटे, यांच्या सह आठ अधिकारी,५० अंमलदार,३७ होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त शहरी व ग्रामीण भागात ठेवला होता ,तर नवरात्र महोत्सव निमित्ताने ब्रम्होत्त्सव आयोजन श्री.बालाजी मंदिर देवस्थान कौठा, सिडको हडको येथे ही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री उशिरापर्यंत दुर्गादेवी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ यांनी विधीवत पूजा करून दुर्गादेवी ढोल ताशाचा व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये मिरवणूक काढुन स्थापन केली,यात शहरी भागातील हडको भागातील रविवार बाजार अयोध्या, पि.एन.पि.२ हडको अयोध्या , वैभव दुर्गा महोत्सव गोविंद गार्डन हडको, श्री.शिवनेरी दुर्गा महोत्सव हडको ,गुरूवार बाजार सिडको येथील वैष्णवी, जयभवानी दुर्गा महोत्सव वाघाळा, छत्रपती दुर्गा माता, नटराज , नवयुवक दुर्गा एन.डी.१ मातोश्री नगर, यांच्या सह अनेक मंडळांनी दुर्गा देवीची स्थापना केली.