हिमायतनगर| मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात आज दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी महाविद्यालयातील हिंदी विभागा तर्फे 'हिंदी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम या लाभल्या, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पवार दीपक हिंदी विभाग अध्यक्ष दिगंबर राव बिंदू महाविद्यालय ता.भोकर . यांना आमंत्रित करण्यात आले होते.
आपल्या मार्गदर्शनात हिंदीचे महत्त्व पटवून देताना हिंदी ही रोजगार,राजनीति आणि जन- जन को जोडणे वाली भाषा असे म्हटले. हिंदी मध्ये विविध क्षेत्रांमध्ये चित्रपट , संगीत, क्रिडा, असो व्यवसाय अध्यापन यामध्ये रोजगार उपलब्ध होवू शकतो हे पटवून दिल. यामध्ये अध्यक्क्षयी भाषणामध्ये डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या वाणी मधून विद्यार्थ्यांना हिंदीच सौंदर्य बोध व महत्व पटवून सांगितले.सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. शेख शहेनाज मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश चटणे विद्यार्थ्यांने केले. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन डॉ . शिवाजी भदरगे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे विद्यार्थिनी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थितीत होते.