हिमायतनगर| मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागा तर्फे 'जागतिक ओझोन दिन' साजरा करण्यात आला.
त्या अनुषंगाने पर्यावरणशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि पोस्टर आणि विज्ञान प्रदर्शन आणि चित्र भिंती पत्रक या दोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ह्या स्पर्धेत बऱ्याच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला, दोन्ही स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात आले, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम महाविद्यालयातील सेमिनार हॉल या ठिकाणी घेण्यात आला, ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.श्याम इंगळे आणि महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ.गजानन दगडे आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.के.कदम सर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीमाता आणि हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी टाकून करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक आशिष दिवडे सर यांनी केले, प्रास्ताविक करीत असताना त्यांनी ओझोन दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी आणि ओझोन चे पर्यावरणाचे समतोल राखण्यात महत्व याबद्दल उपस्थितांचे मार्गदर्शन केले, प्रमुख उपस्थितीत डॉ.श्याम इंगळे सर यांनी ओझोनचे विघटन आणि त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम यांनी पर्यावरणाच्या संवर्धनात विद्यार्थ्यांची आणि समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे सांगितले तसेच पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक आशिष दिवडे यांनी त्यांच्या विभागात विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या आस्क मी? या नवीन उपक्रमा चे समर्थन आणि प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याचे आवाहन केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा डॉ.के.बी.पाटील यांनी केले, कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,ओझोन दिना निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत बी.एस्सी.तृतीय वर्षाची विद्यार्थिनी सदाफ मारिया हिने प्रथम, तस्बिया अंजुम अब्दुल अहद हिने द्वितीय, महेविश बानो शेख जावेद हिने तृतीय आणि बी.एस्सी. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु.नागेवाड पूजा अशोक हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला तसेच विज्ञान प्रदर्शन आणि भिंती चित्र पत्रक या स्पर्धेत बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कू. शिवानी संजय चाभरेकर आणि कु.जान्हवी बालाजी चव्हाण यांनी प्रथम, कु.भोयर पुष्पा पांडुरंग आणि तहेनिया नौशीन मुझम्मील यांनी द्वितीय, बी.एस्सी.तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु.वैष्णवी गंगाधर मिरजगावे आणि कु.स्नेहा विश्वनाथ सूर्यवंशी यांनी तृतीय तर बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी शमा बेगम शेख मुर्तुजा,आसिया बेगम नजीर अहेमद, ईफत तुन नुर मुजीब खान यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला, सर्व विजेत्या स्पर्धकांना पर्यावरणशास्त्र विभागा तर्फे मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.