नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय, सिडको शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. या यशाबद्दल शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे व स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख एस आर भोसीकर यांचे
संस्थेचे उपाध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक रवी शिवाजीराव जाधव, शाळेचे मुख्याध्यापक प्रा व्ही.के.हंगरगेकर , पर्यवेक्षक एन.एम भारसावडे व सहशिक्षक एस.आर.बीरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहशिक्षक एस एन शिंदे,बी.बी.पाटोळे उपस्थित होते. सदर परीक्षेसाठी शिवाजी विद्यालयातील एकूण ६५ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी १९ विद्यार्थी पात्र झाले तर ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाळेतील पांचाळ सिध्देश्वर मुरलीधर, पांचाळ विनायक तुकाराम,टाक शर्वरी उमेशराव, नांगरे मेघा इरबा,कांबळे विद्या नवनाथ,शर्मा सुमित मनोहर,माचेवाड अंजली आनंदा, पाटील आदित्य निवृत्ती, तुंबरफळे जळेश्वर राजेश्वर, नकितवाड कृतिका चंद्रकांत,लोसरवार सोनल गोविंद, लोखंडे प्रतिक विनोद, काळे सुरज अंकुश, बोगेवाड हरीओम रमेश,कऱ्हाळे प्रेरणा अमृत,तेलंगे निशा, जाधव ओमकार दीपक, कुलकर्णी लक्ष्मीकांत संतोष, दरेगावे अनुजा यशवंतराव हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड या संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव साहेब,संस्थेचे उपाध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक रवी शिवाजीराव जाधव, शाळेचे मुख्याध्यापक प्रा व्ही.के.हंगरगेकर , पर्यवेक्षक एन.एम भारसावडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले.
सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जाते.आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना,तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते.