नांदेड। राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड ,नाजिमसह बँक शाखा सिडकोच्या वतीने जोशी सांगवी येथे आर्थिक व डिजीटल अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर रोजी शेतकरी सभासद बांधवांचा मेळावा ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आला या वेळेस बँकेच्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय कदम यांच्यी उपस्थिती होती.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा सिडको अंतर्गत असलेल्या जोशी सांगवी ता.लोहा येथे अध्यक्ष दिंगाबर पाटील मोरे,प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अजय कदम, सरव्यवस्थापक एम.टी.शिंदे,सिबीएस कक्ष प्रमुख संजय कदम,वाळुजकर, सिडको शाखा व्यवस्थापक विठ्ठल पवळे,रोखपाल राजु देशमुख,सचिव विलास कवडे, संरपच परमेश्वर थोटे, ऊपसंरपच विक्रम मोरे,चेअरमन रामराव पाटील मोरे, तंटामुक्त अध्यक्ष धरमाजाळी जगदळे, माजी सरपंच बळीराम गोमसकर,केशव काकणाजी,चांदु गजभारे,दता धोंडीबा,लालुसाब चादसाब, ग्रामपंचायत सदस्य चांदु गजभारे, मारोती शिंदे , पंडित मोरे, माधवराव मोरे, शाम जाधव, माली पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अजय कदम,एम.टी.शिंदे यांनी ऊपसिथीत शेतकरी बांधव यांना मार्गदर्शन केले,सुत्रसंचलन माणिका गायकवाड,तर तिरूपती मोरे आभार यांनी केले.