हिमायतनगर| पोलीस स्टेशन हिमायतनगर तर्फे तालुक्यातील मौजे टेंभी येथील ग्रामपंचायत कार्यालय समोर व परिसरात दोन ठिकाणी दारू विक्री करणाऱ्यावर धाड टाकण्यात आली. चोरी वारकरी करण्याच्या उद्देशाने दारू बाळगून मिळून दिल्याप्रकरणी ३ जणांवर अवैद्य रित्या विनापरवाना दारू विक्री प्रकरणी कलम-65 इ मदाका प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात अवैद्य रित्या देशगी दारूची विक्री केली जाते अश्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच गणेशेत्सव काळात शांतता कमिटीच्या बैठकीत आवडीआय दारू विक्रीचा मुद्धा मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्यामुळे अवैद्य दारू विक्रेत्यांनी कार्यवाहीची धास्ती घेऊन काही दिवस हा प्रकार बंद केला होता. पुन्हा अवैद्य रित्या दारू विक्रीला ऊत आला असून, याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून आणि पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी दिलेल्या आदेशावरून पोहेका आतिश सूर्यकांतराव राचलवार यांनी धाड टाकली असता गणेश राजाराम काळबांडे वय २५ वर्ष रा. जनता कॉलनी हिमायतनगर हा दिनांक 17 रोजी सकाळी 11.20 वाजताचे सुमारास मौजे टेंभी येथील ग्रामपंचायत कार्यालय समोर असलेल्या विहिरी जवळ दारू विकत असल्याचे दिसून आले. यावेळी धडा टाकूली असता विना परवाना बेकायदेशीर रित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आले. त्याच्याकडून अंदाजे 3290/- रुपयाची देशी दारू जीएम जोश संत्राचे 180 एम एल क्षमतेच्या एकूण 47 प्लास्टिकचे शील बंद बॉटल किमती अंदाजे 70 रुपये दराप्रमाणे असा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच अन्य एका ठिकाणी याचा गावात गंगाधर दत्ता तिघलवाड वय 60 वर्षं व्यवसाय- मजुरी या.टेंभी ता. हिमायतनगर. आणि रामराव तुकाराम शिंगणवाड वय 55 वर्ष व्यवसाय -मजुरी रा.टेंभी तालुका हिमायतनगर हे दिनांक 17 रोजी वेळ 11.45 वाजताचे सुमारास मौजे टेंभी येथे 1330/- रुपयाची देशी दारू जीएम जोश संत्राचे 180 एम एल क्षमतेच्या एकूण 19 प्लास्टिकचे शील बंद बॉटल किमती अंदाजे 70 रुपये दराप्रमाणे आणि 25000/- किमतीची एक काळया हिरो स्प्लेंडर कंपनीची रंगाची मोटर सायकल जिचा मोसा.क्रमांक-MH-26 BW 6380 असा असलेली किमती अंदाजे जुनी वापरती. एकुण- 26330/-रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आपले ताब्यात बाळगलेला आढळून आल्याने मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत आतिश सूर्यकांतराव राचलवार वय -40 वर्ष व्यवसाय- नौकरी पोहेका बक्कल नंबर 992 नेमणूक पोलीस स्टेशन हिमायतनगर यांचं फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.