उपनगराध्यक्ष वाले व वंचितच्या आंदोलन इशाऱ्या नंतर कंधार रोडचे काम सुरू -NNL


लोहा|
तहसील कार्यालयात समोरील ते आश्रमशाळा पर्यंत चे कामाचा गेल्या दिवाळी पासून खेळखंडोबा सुरू आहे.पाऊस पडला की चिखल ..उन्ह पडलं की धूळ या त्रासात या भागातील नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष दता वाले यांनी उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग कंधार याना धारेवर धरले तर "वंचित "आघाडीच्या वतीने काम सुरू करा. अन्यथा १२ रोजी रास्ता रोको करू असा इशारा दिला. त्यानंतर गुतेदार व संबंधित विभाग खडबडून जागे झाले आणि रखडलेले काम सुरू झाला.

शहरातील मुख्य चौक ते कंधार-देगलूर -तेलंगणा सीमा असा रोड मागील दोन वर्षा पासून सुरू आहे जवळपास उभा रोडचे काम झाले आहे पण लोहा शहरा जवळील धावरी फाटा येथील पुलावर काम रखडले तर आश्रमशाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हे काम संबधित गुतेदार त्याच्या मर्जीप्रमाणे दिवाळी पासून करीत आहेत. ऊन पडले की धूळ आणि पाऊस पडला की चिखल असा दुरावस्थेत तहसील कार्यालया समोरील नंदिकेश्वर, जायकवाडी वसाहत भागातील रहिवाशी मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत पण गुतेदार मस्त ..नागरिक त्रस्त..अशी अवस्था आहे.

● वंचित 'चा रस्ता रोको चा इशारा●

हे काम बंद पडले संबधित गुतेदार यांनी काही कारणे सांगून येथील साहित्य हलविले. त्यामुळे वंचित बहुजनच्या वतीने तात्काळ काम सुरू करा. अन्यथा १२ रोजी रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा तालुकाध्यक्ष  सतीश  आनेराव, दतराम शेटे , बसवचे हरिहर शेटे व कार्यकर्त्यांनी दिला तसे निवेदन त्यांनी संबधित विभाग, तहसीलदार यांना दिले त्यानंतर यंत्रणा खडबडून जागे झाली

● दता वाले बोले..अधिकारी हाले●

उपनगराध्यक्ष दता वाले हे जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील यांचे खास विश्वासू मानले जातात. प्रशासकीय पातळीवर त्याचे वजन आहे त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यामुळे ते अनेकांच्या मदतीला धावून जातात. पण त्याची सवंग प्रसिद्धी करत नाहीत. उपरोक्त रखडलेल्या कामात दता वाले यांनी संबधित विभागाचे कंधार येथील उपअभियंता यांच्याशी चर्चा केली. तात्काळ काम सुरू करावे असे सांगितले. वंचितचा इशारा व उपनगराध्यक्ष वाले याचा पाठपुरावा त्यामुळे तहसील कार्यालया समोरील रखडलेले काम पुन्हा सुरू झाले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी