ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्यानंतर समाजाकडे पाहताना उघड्या डोळ्यांनी पाहायला शिका - सूर्यकांताताई पाटील -NNL

हुजपा महाविद्यालयात "पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ" संपन्न 

श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी बहाल 


हिमायतनगर, अनिल मादसवार| स्वतःच आत्मपरीक्षण स्वतःच करा, तुम्हाला काय येत... काय येत नाही... हे स्वतःला माहित असते. यासाठी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएटची पदवीचा वापर केला पाहिजे. केवळ पदवी हि नौकरी मिळविण्याचे साधन आहे असे मला अजिबात वाटत नाही. नौकऱ्या सरकारकडे नाहीत तुम्हाला काय करायचं ते तुम्ही स्वतःचा ठरविलं पाहिजे. आता डिग्री प्राप्त झाली आहे त्याचा कसा वापर करायचा हे तुम्हीच ठराव. आता तुम्ही ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्यानंतर समाजाकडे पाहताना उघड्या डोळ्यांनी पाहायला शिका असे प्रतिपादन श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांनी केलं. 

त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात आयोजित पदवी वितरण समारोह प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. आज दि.०७ सप्टेंबर रोजी मोठ्या हुजपा महाविद्यालयात "पदवी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम" मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री तथा मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय सूर्यकांताताई पाटील ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड तथा माजी सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड, विभाग नांदेड डॉ. शैला सारंग यांची उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थिती म्हणून मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव श्री अरुण कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. गजानन दगडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ आणि हुतात्मा जयंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलाने करण्यात आली.


यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, आजही ग्रामीण व शहरी भागामध्ये मुलींची सुरक्षा फार मोठी समस्या बनली आहे. मुली सुरक्षित नाहीत, मुलींना सुरक्षित ठेवणं सामाजिक दृष्ट्या तुमची सुद्धा जबाबदारी आहे. मुली सुशिक्षित झाल्या मात्र सुरक्षित राहिल्या नाहीत तर समाजावर फार मूलगामी असे परिणाम होतील आणि समाजामधील काही संस्था नष्ठ व्हायला लागतील याची भीती मला वाटते. या जगामध्ये जागतिक ग्लोबल वोर्मिंगचा प्रश्न होता याकडे आम्ही कुणीच गांभीर्याने लक्ष दिल नाही. आम्ही झाडे लावा... झाड जगवा... मुली शिकवा मुली वाढावा म्हणत राहिलो. 


मुलीतर शिकल्या मात्र जगलेली झाड वाढली नाही म्हणून भूमीच जे सखलं आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात झालं कि, एवढा प्रगत असणारा युरोप आज दुष्काळात आहे. पेन आणि इटली मधल्या नद्या आटत आहेत. राहीन नदीला बघायला सर्व जगातील लोक जात होते त्या नदीतील दगडे उघडी पडलेली आहेत. तिथल्या वाहतूक मंडळे बंद पडली आहेत. त्यामुळे प्रचंड महागाई वाढली आहे हा सर्व प्रकार पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळं होतो आहे. या पुढील काळात आणखी भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे मनुष्य जन्माला आल्यानंतर किमान १० तरी झाडे लावावी आणि ती झाडे जोपासावी हे ज्ञान सुद्धा सर्व महाविद्यालयातून देण्याची गरज आहे. 

तसेच पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी समाजासाठी देखील आपण काहीतरी केलं पाहिजे अशी भावना ठेवणे आवश्यक आहे. मुलींनी सुद्धा स्वतःचा अस्तित्व सांभाळलं पाहिजे याची जोपासना करण्यासाठी या डिग्रीचा तुम्ही वापर करा. समाजात वावरताना कोणाचीही भीती भय अजिबात बाळगायचं कारण नाही. सुरक्षेचे उपाय तुमच्या जवळ आहेत फार मोठी सुरक्षा सरकारच्या माध्यमातून लाभलेली आहे. तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे त्याची जाणीव व नियम असले पाहिजे. यासाठी पुस्तके टाकून न देता जे जे उपयुक्त आहे त्याचं वाचन केलं पाहिजे असे सांगून त्यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.    

कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी केले. त्यानंतर सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. शैला सारंग यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशाची उंची गाठण्यासाठी ध्येय ठरवून घ्या. आपण मोठे झालो म्हणजे आपल्ये ध्येय पूर्ण होत नाही तर आपल्यासोबत समाजातील व ग्रामीण भागातील इतरांनाही आपल्या बरोबरीने पुढं आनण्यासाठी प्रयत्न केल्यावरच आपण यशस्वी झालो असल्याचे समाधान मिळेल. असे सांगून त्यांनी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. गजानन दगडे यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वसंत कदम यांनी केली. पदवी वितरण सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी