हिमायतनगर, अनिल नाईक| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयदशमीच्या शुभमुहूर्तावर शहरातील परमेश्वर मंदिरापासून सघोष पथसंचालन व शस्त्र पूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वाढोणा येथे प्रमुख मान्यवर वक्त्यांनी उपस्थितांना बौद्धिक मार्गदर्शन केले. भोकर, किनवट, आदी ठिकाणाहून स्वयंसेवक उपस्थित झाले होते.
दि.१६ शनिवारी हिमायतनगर (वाढोणा) येथे सकाळी ०९ वाजता येथील श्री परमेश्वर मंदिरात प्रथम वाद्याच्या गजरात रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानंतर ध्वजवंदन प्रार्थनेननंतर विजयादशमी पथसंचालनाची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. शोभायात्रेत युवकांनी संघाचे गणवेश धारण करून हाती भगवा ध्वज घेऊन सघोष संचलन शिस्तबद्ध पद्धतीने केले. पथसंचालन शोभा यात्रा परमेश्वर मंदिरात येताच भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांनी फडाटक्याच्या अतिशबाजाची स्वागत केले.
त्यानंतर श्री परमेश्वर मंदिराच्या सभागृहात मंदिरात डॉ हेडगेवार, छत्रपती शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन आणि शात्राचे पूजन करण्यात आले. आणि मान्यवरांनी उपस्थितांना बौद्धिक मार्गदर्शन केले. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नटे म्हणून पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन, पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते, डीएसबीचे कुलकर्णी, बिट जमादार हेमंत चोले आणि पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱयांनी हि शोभा यात्रा निर्विघ्न पार पडावी म्हणून बंदोबस्त ठेवला होता.