नांदेड| शहरात ज्या दिवसापासून कोविड लसीकरण सुरू झाल्यापासून ५६१ दिवसापर्यंत मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट वाटपाचा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा उपक्रम हा जगावेगळा असल्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमी असल्याचे प्रतिपादन २०० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी केले.
श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने सेवा पंधरवडा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हा अध्यक्ष प्रवीण साले यांच्यासह व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी विकास माने, शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिर्शीकर, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी कार्यक्रम घेण्यामागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली.प्रवीण साले, डॉ. भोसीकर यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांचे तोंड भरून कौतुक केले.
नरेंद्र मोदी यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या २०० आरोग्य कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा शिखसेल चे जिल्हा संयोजक सरदार कृपालसिंघ हुजूरिया, जसबीरसिंग धुपिया, हर्जितसिंग पदम, अनुपसिंग दफेदार ,रमणसिंग हुजूरिया यांच्यातर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामाजी सरोदे तर आभार अरुणकुमार काबरा यांनी मानले. कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्ष अरविंद भारतीया, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंग हजारी व शतकारका पांढरे, महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शितलताई भालके, उपाध्यक्षा सुषमा ठाकूर, जिल्हा चिटणीस मनोज जाधव, कामगार आघाडीचे सुरेश लोट, लायन्स अध्यक्ष शिवा शिंदे, विश्वंभर शिंदे, रुपेंद्रसिंघ साहू, प्रणिता देशमुख,अपर्णा मोकाटे, यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभुदास वाडेकर, संतोष भारती, शांतीकुमार देगावकर, परिसेविका अनिता नारवाड,चंद्रभान कंधारे, माधव शिंदे,सुनिता सावामचल, अंजना मंदावाड,शंकर गिरडे यांनी परिश्रम घेतले. पक्षाने एका आठवड्यासाठी घेण्यासाठी दिलेला कार्यक्रम सलग दीड वर्षापर्यंत अखंडित सुरू ठेवल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.