नाळेश्वर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील लंपि चे लसीकरण अंतिम टप्प्यात - डॉ. अश्विनी खरवडकर -NNL

 

नांदेड| तालुक्यातील नाळेश्वर पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ अंतर्गत  एकूण सहा गावे आहेत  नाळेश्वर, ढोकी, पिंपळगाव कोरका, रहाटि, सोमेश्वर, जैतापूर, आजपर्यंत १५००  लसीकरण जवळपास पूर्ण झालेले आहे.नांदेड तालुक्यातील वाघी या गावामध्ये एक लंपिचा पेशंट(गाय) आढळलि होति.

पाच किलोमीटर अंतरात येणाऱ्या गावांचे सर्व लसीकरण ७२  तासांत करण्यात आले तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ अविनाश बुनावार यांच्या मार्गदर्शनाखाली चार टीम तयार करण्यात आले  व गावातील सर्व चार महिन्यांवर वरील वासरे गायी बैलं यांना लसीकरण करण्यात आले .दवाखान्या अंतर्गत सर्व गावात गोठे स्वच्छता व फवारणी यांची प्रात्यक्षिके दाखवून पशुपालकांना गोठा स्वच्छतेच्या सूचना देण्यात आले.

तसेच लंपि रोगाचा प्रसार वाढू नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना बद्दल सविस्तर मार्गदर्शन  डॉक्टर अविनाश बुऩावार डॉक्टर अश्विनी खरवडकर व त्यांचे सर्व सहकारी शेख मकसूद, राम जमदाडे, गजानन बोकारे ,गोरखनाथ धुमाळ, मारोती वाघोळे , खंदारे यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल पशुवैद्यक दवाखाना नाळेश्वर कडून त्यांचे  आभार

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी