औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती -NNL


औरंगाबाद|
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी नमूना-19 मधील अर्ज स्वीकारण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व पदनिर्देशीत अधिकारी मिळून 16 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात मतदार नोंदणीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस उपायुक्त (सा.प्र.) जगदीश मिनियार, उपायुक्त (पुनर्वसन) पांडुरंग कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त (मागासवर्गीय कक्ष) शिवाजी शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

1 ऑक्टोंबर 2022 रोजी मतदार नोंदणीची जाहिर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर नोंदणीला सुरूवात होणार आहे. 15ऑक्टोबर 2022 रोजी नोटिसीची प्रथम पूर्नप्रसिध्दी, 25 ऑक्टोंबर रोजी नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी केली जाणार आहे. 7 नोव्हेंबर नमूना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम दिनांक. 19 नोव्हेंबर रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई,  23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर, 2022 दावे व हरकती स्वीकारले जाणार आहेत. 

25 डिसेंबर, 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली.  भारताचा नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती ज्याचा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वसाधारण रहिवासी आहेत आणि 1 नोव्हेंबर, 2022 पूर्वी लगतच्या सहा वर्षापैंकी एकूण तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम करीत असल्यास मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र असेल असे सांगून निवडणूक अर्हता संदर्भात सविस्तरपणे माहिती श्री.केंद्रेकर यांनी यावेळी बैठकीत दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी