सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे वतीने श्री चे विसर्जन...NNL


नविन नांदेड।
नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या सिडको शाखेच्या वतीने प्रथमच या वर्षी बसविण्यात आलेल्या श्री मुर्तीचे विसर्जन फुलांचा पुष्प वृष्टी मध्ये सिडको येथील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मुर्ती संकलन केंद्र येथे सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांच्या कडे सुपुर्द करून नानक सर झरी येथील खदानीत रात्री उशिरा करण्यात आले.

सिडको वृत्तपत्र विक्रेते सेटंर येथे नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने बांधुन देण्यात आलेल्या टिन शेड सेटंर येथे नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर व वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर सचिव बालाजी सुताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव साजरा करण्यात आला,या वेळी ३१ आगसष्ट रोजी विधीवत पूजन किरण चेरकर यांच्या हस्ते विधीवत पूजन करून श्री ची स्थापना करण्यात आली तर दैनंदिन सकाळी व संध्याकाळी महाआरती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे चंद्रकांत घाटोळ, गणेश वडगावकर, बाबु जलदेवार, संदीप कटकमवार यांनी ही महाआरती केली तर ८ सप्टेंबर रोजी वृत्तपत्र कुटुंबीयांसाठी महाआरती व भंडाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील सर्व वृतपत्र  विक्रेते यांच्या परिवारातील सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,९ सप्टेंबर रोजी फुलांचा पुष्पवृष्टी मध्ये ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढुन करण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री चे विसर्जन गोदावरी नदीच्या पात्रात न करता सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे मुर्ती संकलन केंद्रात मुर्ती सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोधदीन व कर्मचारी यांच्या कडे देऊन झरी नानकसर खदान येथे करण्यात आले,  गणेशोत्सव साजरा करण्याची जेष्ठ विक्रेते व मदनसिंह चव्हाण, दौलतराव कदम, शेख सयोधदीन, रामनाथ दमकोडंवार, महिला वितरक वंदना लोणे, राजु चव्हाण, बालाजी दमकोडंवार,साई गोटमवार,सांवत , ठाकूर,नांदेडकर,राम धांवडे,अनिल धांवडे,शुभम,गणेश कांबळे तातेराव वाघमारे यांच्या सह संजिव कुमार गायकवाड,सुधाकर काकडे,योगी पत्रकार किरण देशमुख, तिरूपती पाटील घोगरे, छायाचित्रकार सांरग नेरलकर, यांनी सहकार्य केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी