ग्रामीण पोलीस स्टेशन हदीत गणेश विसर्जन शांततेत,गुलाला ऐवजी पुष्प वृष्टी, ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजी -NNL



नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हदीत शहरी व ग्रामीण भागात गणेश मुर्ती चे विसर्जन सहा ठिकाणी  शांततेत संपन्न झाले, यावेळी शहरी भागात मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी दिलेल्या आदेशानुसार नदीपात्रात गणेश मुर्ती विसर्जन न करता मनपा कर्मचारी नियुक्त घाटावरील मुर्ती संकलन केंद्रात अनेकांनी सहकार्य केले तर जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली,तर सिडको परिसरातील मुख्य मिरवणुकीत सजिव देखावा जय महाराष्ट्र,व व्यंकटेश गणेश मंडळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चारित्र्यावर आधारित देखावा दाखवुन दुतर्फा गर्दी असलेल्या भावीक भक्तांची मने जिंकली, तर हडको परिसरातील ओंकार गणेश मंडळाचा सर्वात उंच असलेल्या मुर्तीने लक्ष वेधून घेतले होते तर ग्रामीण पोलीस स्टेशन चा वतीने  शैकडो फुले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना पुष्प वृष्टी साठी देण्यात आले होते, ढोल ताशा व फुलांच्या पुष्प वृष्टी मध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत शहरी भागात २४  परवानगी असलेले तर विनापरवाना ८ तर ग्रामीण भागात २४ परवानगी १६ विनापरवाना  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांनी रितसर परवानगी घेतली होती तर् काही ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात लहान मुलांनी बसवलेल्या गणेशोत्सव मंडळ यांच्यी नोंद घेण्यात येऊन गणेशोत्सव काळात पोलिसांनी सुचना दिल्या, दहा दिवसांचा कालावधी मध्ये पोलीस स्टेशन च्या  वतीने शहरी व ग्रामीण भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांच्या  वतीने सिडको व हडको भागातील मुख्य मार्गावर आणि परिसरातील भागात पोलीस पथसंचलन करण्यात आले.ग्रामीण पोलीस स्टेशन हदीत सहा ठिकाणी गणेशोत्सव विसर्जन करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.


यात नानकसर झरी खदान  येथे नावघाट वसरणी व काळेश्वर मंदिरातील घाटावर गणेशाचा मुर्ती चे विसर्जन शांततेत संपन्न झाले. वरील नियोजित ठिकाणी ९  सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत  ईतवारा व ग्रामीण पोलीस स्टेशन  हद्दीतील मोठ्या १५० गणपती तर  छोट्या व मोठ्या अशा जवळपा अनेक मुर्ती चे विसर्जन क्रेन चा साह्याने  करण्यात आले, मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने, उपविभागीय अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे, ग्रामीण चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या सह सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन  यांनी झरी खदान येथे भेट देऊन पाहणी केली व संबंधित नियुक्त कर्मचारी यांना सुचना दिल्या. ग्रामीण चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले ,सुरेश थोरात, उपनिरीक्षक महेश कोरे,आंंनद बिचेवार,माणिक हंबर्डे,आंंनद बिचेवार,विजय पाटील, बालाजी नरोटे  यांच्या सह पोलीस अंमलदार व महिला पोलिस होमगार्ड , राखीव दलातील  यांनी शहरी व ग्रामीण भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

    हडको परिसरातील मुख्य रस्त्याने निघालेल्या मिरवणुकीत हडको येथील ओकांर,महाराणा प्रताप, शिवपुत्र, शिवगणेश ,शंभो नारायण यांच्या सह परिसरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ

यांचा व बळीरामपुर येथील जय महाराष्ट्र,व व्यंकटेश गणेश मंडळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चारित्र्यावर आधारित सजिव देखावा ने भावीक भक्तांची मने जिंकली, मिरवणूक मार्गावर हडको व सिडको परिसरात अन्नदान राजेश कदम,भरकड परिवार कल्याण मेडीकल,देविदास कदम,  राहुल गवारे,ज्ञानेशवर दु़धबे,निजा जाधव,अमोल राठोड तुकाराम बेस्टे, गंगा टेलर, निखील पटेल दिनेश रंगदाळ, सत्यदिप ठाकूर यांनी पुरीभाजी ,खिचडी, चन्ने ,व पाणी व्यवस्था केली होती,तर ग्रामीण भागातील अनेक गावात भंजनी मंडळ,भंडारा यासह ढोल ताशा गजरात पारंपारिक पद्धतीने श्री चे विसर्जन करण्यात आले.

    ग्रामीण पोलीस स्टेशन चा वतीने ग्रामीण व शहरी भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना मिरवणूक दरम्यान गुलाल ऐवजी गुलाब फुले वाटप करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर युवा नेते उदय देशमुख, डॉ.नरेश रायेवार यांच्या सह सामाजिक, राजकीय,शिक्षण क्षेत्रातील व पत्रकार यांच्या सह अनेकांनी सहभाग घेतला होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी