आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जिल्हा जात पडताळणी कार्यालयात जयंती साजरी - NNL


नांदेड|
उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी 07 सप्टेंबर 1791 रोजी. पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला.वडिल दादोजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. 

त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरे आणि करारी होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसे उमाजीराजे मोठे होत गेले तसा त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक : 07 सप्टेंबर 2022 रोजी. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मा. श्री. एस. एम. मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. व कार्यालयात आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होनवडकर, अमोल वाकडे, अनिकेत वाघमारे, सुनील पतंगे, संजय मंत्री लहानकर यांची उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी