नांदेड येथे संपन्न हत्तीरोग एमएमडीपी प्रशिक्षण -NNL


नांदेड|
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग (हत्तीपाय) रुग्ण यांची देखभाल व काळजी याबाबत मॉरबिडीटी मँनेजमेंट डिसऐबिलीटी प्रिव्हेन्शन (एमएमडीपी) प्रशिक्षण दि.६ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे जागतिक आरोग्य संघटनेचे (एनएनडी) राज्यस्तरीय सम्नवयक डॉ. राजेंद्रकुमार सिंह यांनी  प्रशिक्षण व हत्तीपाय रुग्ण याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी नांदेड यांनी सदरिल प्रशिक्षणा बाबतचे प्रास्ताविक केले. 

नांदेड जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राआकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. डॉ राजेंद्रकुमार सिंह यांनी हत्तीरोग विषयी पॉवरपाईट प्रझेन्टेशन द्वारे विस्तीर्ण माहिती दिली. हत्तीपाय रुग्ण यांची कशी देखभाल व काळजी घेण्यात यावी याचे प्रत्यक्ष हत्तीपाय रुग्णाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. जिल्ह्यातील हत्तीपाय रुग्ण यांना एमएमडीपी किट देण्यात आले आहेत त्याचे कशाप्रकारे उपयोग करावा याची माहिती दिली. 

यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ  बारी लोहा, डॉ अशोक मुंडे भोकर, डॉ गुंटूरकर नायगाव, डॉ ढगे हदगाव, डॉ आनंद पाटील अर्धापूर, डॉ सुकळीकर बारड, डॉ विद्या झिने माहूर, डॉ ईकबाल शेख प्र.धर्माबाद, डॉ उमनवार प्र.मुदखेड, डॉ पवार प्र. बिलोली, डॉ. तहाडे प्र.मुखेड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले मुखेड, डॉ प्रविण मुंडे नांदेड, डॉ वाडेकर बिलोली, धर्माबाद, डॉ देवराये उमरी, डॉ संदेश पोहरे हि.नगर, डॉ मुरमुरे किनवट, डॉ दिपक कदम हदगाव, शेख एम ऐ प्र.भोकर, वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कासराळीकर मुगट, डॉ केंद्रे रो.पिंपळगाव, डॉ राठोड तुप्पा, डॉ गायकवाड, डॉ आनंद पबीतवार बरबडा, आरोग्य पर्यवेक्षक सत्यजीत टिप्रेसवार भोकर, मुदखेड, व्यंकट माचनवाड मुखेड, साईबाबा बनसोडे उमरी, एन.बी.नाईक हि.नगर, नारायण धांडे धर्माबाद, देवानंद बोधगिरे कंधार, सुभाष बोंबले किनवट, जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील आरोग्य सहाय्यक माधव कोल्हे, रविंद्र तेलंगे, गजानन अल्लापुरे, देवकर, मुकुंदा देवकांबळे, पांडुरंग बोरकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी