आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.डॉ. गणंजय कहाळेकर सन्मानित -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ. गणंजय यज्ञेश्वर कहाळेकर यांना नुकतेच ज्ञान साधना बहुउद्देशीय विकास संस्था, नाशिक यांच्याकडून " आदर्श शिक्षक पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले. 

हा पुरस्कार त्यांनी आजपर्यंत संस्कृत भाषेच्या प्रसार प्रसारासाठी केलेल्या कार्यातील योगदानाबद्दल मिळाला आहे . आजपर्यंत संस्कृत भारतीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष पदावर कार्य केले आहेत . स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड च्या विद्यापरिषदेवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत . अशा उल्लेखनीय कामगिरी बजावल्यामुळे प्रतिभावंत प्राध्यापकाचा गौरव करण्यात आला. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सत्कार समारंभ आयोजित केले होते . 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा.सी.बी.साखरे , सत्कारमूर्ति प्रा.डॉ.कहाळेकर जी.वाय हे व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल वाघमारे तर आभार प्रदर्शन कु.जान्हवी सुवर्णकार यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रवीण गोरे , शिवशंकर कस्तुरे, अमोल राठोड , प्रेम चव्हाण , शैलेश धन्नकवार , कु.वैष्णवी कुलकर्णी , श्रध्दा गेडेवाड यांनी प्रयत्न केले . यावेळी प्राध्यापक , विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. त्यांच्या या यशाबद्दल वीरभद्र शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे, उपप्राचार्य प्रा.एस.बी. बळवंते , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी