नविन नांदेड| श्री. गणेश महोत्सव व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त, जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको नवीन नांदेड येथे विविध सांस्कृतिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. सेवादास प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी वरील उद्गार काढले.
याप्रसंगी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना संबोधित करताना डॉ. नानासाहेब जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिल्यामुळे आदर्श व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते व देशाच्या सामूहिक शक्तीचे संवर्धन व प्रगती होते म्हणून विविध संस्कृतीक कार्यक्रमाचा वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे असे मत त्यांनी व्यक्त करून स्पर्धकांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये संस्थेच्या विविध शाखा, जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेड, वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी,महात्मा गांधी बीएड कॉलेज, सावित्रीबाई महिला बीएड कॉलेज, महात्मा गांधी हायस्कूल, महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल, युनिव्हर्सल हाईट्स इंग्लिश मीडियम स्कूल, कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह आदी शाळा व महाविद्यालयातील स्पर्धकांनी यशस्वीपणे सहभाग नोंदविला सांस्कृतिक स्पर्धेमध्ये देवा श्रीगणेशा वंदन गीत, मोरया मोरया, आईचा गोंधळ, कोळीगीत, लावणी, नाटक, समूहगीत, देशभक्तीपर गीत पथनाट्य, कॉमेडी, गीत गायन आदी स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.पूजा वाघमारे यांची लावणी आणि कॉमेडियन सतीश काशेवार यांची कॉमेडी तसेच जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी सुनील निमशेट्टी यांच्या लावणीने प्रेक्षकांची मने जिंकली व दाद मिळवली तसेच सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या विद्यार्थ्यांचा श्री गणेशा वंदना गीत, महात्मा गांधी विद्यालयाचे आईचा गोंधळ व कोळीगीत, सावित्रीबाई फुले महिला बीएड महाविद्यालयाचे आनंदीबाई नाटक या स्पर्धांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ.डब्ल्यू. आर. मुजावर प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, प्राचार्य डॉ. सुरेश घुले आदींनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्रा. डॉ.दिलीप काठोडे व आभार प्रा. डॉ.निरंजन कौर यांनी मानले. याप्रसंगी संकुलातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम यशस्वी पार पडला अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याची भावना अनेक प्रेक्षक व नागरिकांनी व्यक्त केल्या.