भारत जोडो यात्रेला जन आंदोलनाचे स्वरूप आले पाहिजे - माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
महागाई, बेरोजगारी यासारखे सर्वसामान्यांचे प्रश्न घेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या  भारत जोडो यात्रेस कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला असून ही यात्रा नोहेंबर महिन्यांत नांदेडला पोहचेल  सामाजिक सद्भावाचा संदेश व सामान्यांच्या प्रश्नांसाठीच्या या यात्रेस जन आंदोलनाचे स्वरूप आले पाहिजे यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १२ राज्यातून जाणार असून १५० दिवसांत ३५७० किमीचा प्रवास करून काश्मिरात पोहचणार आहे. ही  यात्रा नोहेंबर महिन्यात नांदेडला येणार आहे या पार्श्वभूमीवर नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशिक्षण व प्रबोधन शिबिरांच्या आयोजना संदर्भात बुधवार दि ७ सप्टेंबर रोजी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत  होते व्यासपीठावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे ,प्रशिक्षण व प्रबोधन समितीचे राज्य समन्वयक विनायकराव देशमुख ,माजी मंत्री डी. पी . सावंत,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ,माजी आ. वसंतराव चव्हाण ,महापौर जयश्री पावडे ,शाम उमाळकर ,खानापुरे आदींची प्रमुख  उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की,महागाई, बेरोजगारी,आदी  सर्वसामान्य नागरिकांच्या  प्रश्नांकडे केंद्रातील सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीतही जनआक्रोश व्यक्त करण्यात आला. आता पुन्हा भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न प्रभावी पणे मांडण्यासाठी व जनतेमध्ये जाऊन संवाद साधण्यासाठी ही यात्रा आहे. ही यात्रा देगलूर -नायगांव -नांदेड -अर्धापूर अशी अंदाजे ४ दिवस नांदेड जिल्ह्यात असणार आहे. यापूर्वीच्या सभा असो की रॅली नांदेडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नीटनेटके आयोजन करून यशस्वी केले आहे. ही यात्रा ही अशीच यशस्वी व्हावी यासाठी आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगीतले. 

यात्रेचे स्वागत करण्यासाठी मार्गावर त्या गावातील व लगतच्या गावातील जास्तीच -जास्त नागरिक सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या  भारत जोडो यात्रेचा उद्धेश सर्वसामान्यापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी लवकरच जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. वाढती बेरोजगारी, वाढत्या किमती  या समस्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहेच, पण केंद्र सरकारमुळे निर्माण झालेले भय, धर्माधता याच्या विरोधात  सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार व सामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष गावा -गावांत पोहचवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रशिक्षण व प्रबोधन समितीचे राज्य समन्वयक विनायकराव देशमुख यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून निश्चित परीवर्तन होईल व गेम चेंजर ठरेल असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविकात  जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी या यात्रेच्या तयारीचा आढावा मांडला. सुत्रसंचलन संतोष देवराये यांनी केले या बैठकीस जिल्ह्यातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी