नांदेड| महासंचालक/ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स /नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज 20.09.2022 रोजी श्री चंद्रप्रकाश मिर्धा, सहाय्यक सुरक्षा आयुक्त, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स /नांदेड विभाग यांच्या देखरेखीखाली रेल्वे प्रोटेक्शन फोर्स चा 38 वा स्थापना दिवस साजरा केला. या स्थापना दिनानिमित्त पुढील कार्यक्रम आयोजित केले होते :
1. नांदेड रेल्वे स्टेशनवर रन फॉर युनिटी,
2. आरपीएफ बॅरेक, नांदेड येथे योग शिबिराचे आयोजन
3. आरपीएफ बॅरेक, नांदेड येथे श्रमदान कार्यक्रम
4. आरपीएफ बॅरेक, नांदेड येथे वृक्षारोपण कार्यक्रम
5. नांदेड स्टेशनवर रक्तदान शिबिर
6. आरपीएफ बॅरेक, नांदेड येथे सुरक्षा संमेलन आयोजित केले आहे
7. बालगृह आणि अनाथाश्रम/वृद्धाश्रम यांना भेट दिली
8. नांदेड विभागातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशी जनजागृती मोहीम.