हदगाव| गेल्या दीड वर्षांपासून वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना देवानंद पाईकराव यांनी गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता ही मोहीम यशस्वी केली.
महाराष्ट्र राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रवक्ता मा.फारुक अहमद ,राज्याचे उपाध्यक्ष अँड गोविंद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बैठका घेऊन गाव पातळीवरील कार्यकर्ते याना प्रोत्साहित करून देवानंद पाईकराव यांनी तालुक्यात 110 गावाच्या शाखा स्थापन कृरुन प्रदेश आघाडी यांच्याकडे आपला कृति अहवाल सादर केल्यानंतर राज्य प्रमुख प्रवक्ता फारुक अहेमद व अँड गोविंद दळवी यांनी देवानंद पाईकराव यांची तालुकाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली.
त्यांच्या सोबत नवीन कार्यकारणी मध्ये एकूण ४५ जणांची निवड रेखा ताई ठाकूर (प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य )यांच्या सहीने नेमणूक करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत नांदेड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निरंजना आवटे ताई व हदगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ सुनीता वाठोर यांनी केले आहे.