नांदेड। टाकळगाव ता.लोहा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त उपसरपंच श्री संभाजी चिंतोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
यावेळी महापुरुष छञपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वामी रामानंद तिर्थ ,लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सरपंच श्री भिमराव लामदाडे पाटील व उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली .
यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकरराव मोरे,माजी सरपंच काशिनाथराव लामदाडे,श्रीहारी लामदाडे,ग्रा.पं.सदस्य रामराव पांचाळ,दत्ता देवकांबळे,चेअरमन शिवाजी मोरे, उप चेअरमन प्रभाकर थेटे,पोलिस पाटील पंढरी थेटे,डिंगाबर लामदाडे,बालाजी मोरे,बळीराम मोरे,दिलीप मोरे,मुख्याध्यापक पवळे सर,अंगणवाडी कार्यक्रती ,मदतणीस, विद्यार्थी/विद्यार्थीनी ईत्यादी उपस्थित होते.