नांदेड। नांदेड तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या झालेल्या अध्यक्षपदाचा निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेनेचे सरचिटणीस बालाजी पाटील सपुरे यांनी ९मते घेऊन विजयी झाले,या निवडी बद्दल ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामादिनाचा वर्धापनदिन निमित्ताने आयोजित ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हा परिषद शाळा नागापूर येथे शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली यावेळी मावळते अध्यक्ष दिलीप मस्के यांच्या कार्यकाळ संपल्याने नविन अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत बालाजी सपुरे यांना नऊ मते पडली तर विरोधी ऊमदेवाराला दोन मते पडली, उपाध्यक्ष पदी मारोती कर्डीले यांच्यी निवड करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते,ऊधोगपती तथा युवा सरचिटणीस बालाजी पाटील सपुरे यांच्यी निवड करण्यात आल्याबद्दल सरपंच व्यंकटी पांचाळ, रामचंद्र कर्डिले, साईनाथ कर्डिले,गजानन मस्के, परसराम मस्के, गोविंद कर्डिले,आंनदा मस्के,दता कर्डिले, मारोती मस्के,विक्रम कर्डिले,राजेश मस्के,राजु मस्के, गंगाधर मस्के, संतोष कर्डिले, संभाजी सपुरे,अवधुत कर्डिले, गणपती कर्डिले,दता मस्के, योगेश मस्के,माधव मस्के,दिंगाबर कर्डिले,श्रिनिवास अंकुश मस्के, सर्व मित्र मंडळ व गावकरी यांनी अभिनंदन केले आहे.सुत्रसंचलन मडावी यांनी तर दिग्रसकर यांनी आभार मानले.