सर्व पक्षीय युवक पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार
लोहा| लोहा शहरात पूर्वी गांजाची चोरून तेही मंगळवारी आठवडी बाजारात कुठेतरी विक्री व्हायची आणि त्याचे सेवन करणारे पन्नाशी ओलांडले असल्याचे पण हल्ली विशीच्या आतला तरुण गांजा सेवनाच्या आहारी गेला आहे. शिवाय व्हाइटनर , स्टिकफास्ट सारख्या आरोग्य घातक असलेल्या नशा पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणांची शहरात दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. यावर वेळीच प्रतिबंध घालावा अशी सर्व पक्षीय युवक पदाधिकारी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष ऍड सुशील सावंत, वंचितचे छगन हटकर, विठ्ठल पाटील टोणगे, शिवसेना शहर प्रमुख गजानन गुंठे - कराडे,संदीप राजकौर व मित्रांनी लोहा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
शहरात विद्यालया पेक्षा मद्यालयांची संख्या जास्तीची आहे शिवाय वाइन मार्ट वर दारू घ्यायची आणि त्याच्या मागील बाजूला उघड्यावर जाऊन दारू पिणे तसेच गल्ली बोळात आणि हॉटेल टपरी वर दारू सहज मिळते. खेडोपाडी तर दारूची विक्री खुल्लेआम होत असते पण संबधित विभागाने धाडसी कामगिरी केल्याचे अलीकडच्या काही वर्षात ऐकवत नाही.दारू बंदी विभागाचे शहरातील ठराविक हप्ता घेऊन या अवैध विक्रीला बळ देत असतात.. कुंपणच शेत खाल्ले अशीच गत.
लोहा शहरासह परिसरात गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत. शाळा परिसर, वखार, महामंडळ , व्यंकटेश गार्डनच्या लगतच्या खुली जागा असा भागात दहा ते पन्नास रुपयात गांजा मिळतो अंधाराचा फायदा घेऊन शाळकरी वयाची मुले ज्या वयात हातात... पेन-पुस्तक असायचा हवे त्या तरुणांच्या हातात गांजाची झुरके व डोळ्यात नशा पहावयास मिळते आहे. व्हाईटनर, स्टिकफास्ट सारख्या घातक पण नशा चढणाऱ्या वस्तूंचे सेवन केले जात आहे. यावर प्रतिबंध घालावा यासाठी ऍड सुशील सावंत, वंचितचे छगन हटकर, शिवसेना शहर प्रमुख गजानन गुंठे ( कराडे) ,विठ्ठल पाटील टोणगे, संदीप राजकौर, प्रसाद जाधव,प्रदीप ढगे,सोमनाथ खरात, या विविध राजकीय पक्षांशी संबधित असलेले तरुण कार्यकर्त्यांनी सामाजिक दृष्ट्या हानिकारक ठरणाऱ्या ज्वलंत प्रश्नाकडे पोलिसांचे लक्ष वेधले आहे आणि समाजाला वेळीच सावध केले आहे.
गांजाची नशा करणाऱ्यांचे वाढते प्रमाण आणि सहजरित्या शहर आणि ग्रामीण भागात गांजा उपलब्ध होत असल्याने शहर व परिसरांत १४ ते १८ वयोगटांतील शालेय मुले याच्या नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे. तेव्हा या तरुणांनी केलेल्या निवेदना बाबत पोलिसांनी कार्यवाही करावी तसेच सामाजिक समस्या समजून व्यसनमुक्ती साठी पुढे येण्याची गरज आहे.