हिंगोली। आज औंढा नागनाथ येथील तहसिल कार्यलयावर शिवसेनेचा वतीने माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला. ज्या मध्ये अतिर्वष्टि झाल्यामुळे शेतकर्याचे नुकसान झाले असुन शासना कडुन कुठलीही मदत मिळाली नाही. त्या अंनुसगाने औंढा तालुका शिवसेनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चा मध्ये औंढा तालुका शिवसेनेच्या मागण्या अतिव्रष्टी दुष्काळ म्हनुन सरकार कडुन तात्काळ शेतकर्याना मदत मिळाली पाहिजे व कोविड काळामधील मृत पावलेल्या शेतकर्याचे कर्ज माप करण्यात यावे, आदी मागण्याचे निवेदन तहसिलदार साहेब यांना दिले..!
तसेच मोर्चा मध्ये उपस्थित मा.खा.सुभाषराव वानखेडे साहेब, माजी मंत्री डाँ जयप्रकाशजी मुंदडा साहेब ,माजी आमदार डाँ संतोष टारफे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख ,शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे, सहसंपर्क प्रमुख सुनिल भाऊ काळे, सहसंपर्क प्रमुख गोपु पाटिल, शिवसेना नेते अजित भाऊ मगर, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, उपजिल्हा प्रमुख जे डी मुळे, ता प्रमुख गणेशराव देशमुख, सेनगांव तालुका प्रमुख संतोषराव देवकर, कळमनुरी ता प्रमुख सखारामजी उबाळे, वसमत ता प्रमुख बालाजीराव तांबोळी औढा ता प्रमुख माऊली झटे यांच्या सहसर्व ,सर्कल प्रमुख शाखाप्रमुख व पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.