अर्धापूर, नीळकंठ मदने| लहान लोण येथील निसर्गरम्य माळ टेकडीवर बुद्ध विहार बांधून बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करून मानवतावादी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले ज्यांनी निराधारांना वृद्धाश्रम अपंगांना वस्तीग्रह आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोय करून ज्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असे दलितमित्र निवृत्तीराव ज्ञानोबाराव लोणे यांच्या 12 वा पुण्यस्मरण उद्या दिनांक 23 सप्टेंबर ,शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजिरी वादक संदीपपाल महाराज यांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे सकाळच्या प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये पुजापाठ धम्मदेसना रक्तदान शिबीर व सामुहिक भोजनदान चे आयोजन केले आहे,धम्मदेसनेला पु.भ. उपगुप्तजी महाथेरो (पुर्णा ), पु.भ. पंय्यारत्न (नांदेड), पु.भ. पय्याबोध्दी (नांदेड), पु.भ. सुभूती (तपोवन-लहान - लोण),पु.भ. शिलरत्न (नांदेड) तर प्रमुख उपस्थिती महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड (बावरीनगर, दाभड-नांदेड) हेही उपस्थित राहणार आहेत ,सांयकाळी तिसऱ्या सत्रामध्ये ठीक ६ वा.नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षांचे प्रतिनिधी ,प्रशासकीय अधिकारी,विविध क्षेत्रातील पदाधिकारी ह्यांच्या उपस्थितीत मधे गरजु लोकांना कपडे वाटप होईल आणि महाराष्ट्रातील सुप्रसिध्द राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज अकोटकर यांचे शिष्य सप्तखंजेरीवादक संदीपपाल महाराज यांचा प्रबोधनपर कार्यक्रमचे उद्घाटन सुद्धा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
प्रबोधनपर कार्यक्रमा नंतर गावातील भिमसंदेश, पंचशील व सिध्दार्थ गायन पार्टीचा भजनगायनाचा कार्यक्रम होईल. ह्या प्रबोधन पर पुण्यस्मरण कार्यक्रमाला आपण सर्वांनी दलितमित्र निवृत्तीराव लोणे यांच्या समाधीस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अशी विनंती धम्म परिषदेच्या संयोजिका तथा लोणी खुर्दच्या सरपंच अनुसयाबाई लोणे, संचालक संजयराव लोणे, राजेश लोणे , नागसेन लोणे, इंजिनियर महेंद्र लोणे, बुध्दसेन लोणे,प्रसेंजित लोणे, समस्त लोणे परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.