ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे उद्घाटन संपन्न
हिमायतनगर। तालुक्यात शिक्षणाला महत्व देत ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्याला हिमायतनगर शहरात शाळा तसेच क्लासेस साठी प्राधान्य देताना दिसतात. कारण आपला पाल्य मागे नाही राहिला पाहिजे.शिक्षणाचे महत्व त्यांना कळाले आहे.या स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे वक्तव्य हिमायतनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी ज्ञानदीप कोचिंग क्लासेस च्या उदघाटन प्रसंगी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक बि डी भुसनूर यांनी रिबीन कापून केली.त्यानंतर विद्येची देवता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांनी केले.यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश राठोड यांनी केले. शेवटी ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक देवानंद गुंडेकर व कृष्णा राठोड यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमास उपस्थितांनी संचालकांना अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आशिषभाऊ सकवान,गुरुकुल इंग्लिश स्कूलचे संचालक राम राठोड, पोलीस जामदार अतुल राचटवार, कदम साहेब, जेष्ठ पत्रकार देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी परमेश्वर गोपतवाड, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार,युवा नेते दिनेश राठोड ,पत्रकार विजय वाठोरे,प्रशांत राहुलवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.