नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको परिसरातील न्यु खुरेशिया हाटेल ते बि.के.चव्हाण यांच्या निवासस्थाना पर्यंत मनपा निधी अंतर्गत १५ लक्ष रुपयांचा सिमेंट काक्रेट रस्त्याचे भूमिपूजन माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंतर्गत रस्ता एन.डी.२ भागातील व ऊसमानगर रोड लगत असलेल्या रस्ता अखेर नगरसेविका सौ.चित्रा सिध्दार्थ गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे मनपा निधी अंतर्गत २० लक्ष रुपयांचा निधी सिमेंट काक्रेट रस्ता कामासाठी उपलब्ध झाला होता.
२६ सप्टेंबर रोजी या कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला, निखलेश देशमुख ,शेख लतीफ शेख मेहमूद, अब्दुल रज्जाक साब,असद खान,मोईन लाठर,युसुफ भाई,अस्लम आफीस साब, अन्सारी साब,शेख हबिब,बि.के.चव्हाण,संजय चाकुरकर, व नागरीक उपस्थित होते.