नवीन नांदेड। हडको व सिडको येथील बालाजी मंदिर देवस्थान दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम सह प्रांरभी गरूड ध्वजारोहण व यासह रोषणाई ,सजावट , करण्यात आली आहे तर सकाळी व सायंकाळी दैनंदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, बालाजी मंदिर देवस्थान हडको येथे ब्रह्मोत्सवा निमित्य सतीश गुरु पोतदार ,विनय गुरु परळीकर,इंद्रमनी दुबे ,प्रकाश महाराज यांच्या पौरहित्याखाली दि 26सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान वसकाळी अभिषेक आरती ,बालभोग कलश स्थापना होम हवन ,कुंकुम आर्चन , विष्णुसहस्त्र नाम ,देवता विसर्जनपूर्ण आहुती बलिप्रदान व दसऱ्या निमित्य महाप्रसादाचे वाटप होणार आहे , होम हवन व कल्याण उत्सवाचे मुख्य यजमान संतोष जोशी हे या वर्षी नवीन बांधकाम केलेल्या कल्याण मंडपात होम हवन कल्याण मोहोत्सव होणार आहे.तर
ब्रमहोत्त्सव निमित्ताने प्रांरभी ध्वज गरूड स्तंभावरील ध्वजारोहण छाया शिवानंद निलावार यांच्या हस्ते करण्यात आला , ब्रम्होत्त्सव निमित्ताने शिवानंद निलावार यांच्या कडून दररोज प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, ब्रम्होत्त्सव निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमाला २६ सप्टेंबर पासून प्रांरभ झाला, मंदिर परिसरात रोषणाई, फुलाजी सजावट यासह धार्मिक कार्यक्रम यांना सुरूवात झाली.यावेळी वासवी व वनिता क्लब पदाधिकारी व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती ,दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य आयोजित विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष माणिकराव देशमुख,विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार, उपाध्यक्ष विवेकानंद देशमुख,सचिव बाबुराव येरगेवार ,कोषाध्यक्ष करणसिंग ठाकूर सहसचिव प्रकाशसिंह परदेशी,संतोष वर्मा, बाळासाहेब मोरे,अजय भंडारी ,गोवर्धन बियाणी , सचिन नपाते ,संजिवन राजे चंद्रशेखर चव्हाण, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख यांनी केले आहे.
सिडको भगवान बालाजी मंदिर देवस्थान येथे ब्रम्होत्त्सवाला आज २६ सप्टेंबर पासून प्रांरभ झाला, यावेळी गरूड ध्वज पुजन करण्यात आले तर आचार्य पंडित वटीकोटा रामानुजाचार्य व दिव्याशु महाराज यांच्या आचार्य तत्वाने सुरूवात झाली, मंदिर सजावटीसह परिसरात व मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे,मंदिराचे विश्वस्त साहेबराव जाधव, उपाध्यक्ष बाबुराव बिरादार,सचिव व्यंकटराव हाडोळे, डॉ.नरेश रायेवार,आंंनद बासटवार, वैजनाथ मोरलवार, रामचंद्र कोटलवार, पुरूषोत्तम लाठकर, गोविंद सुनकेवांर, पुंडलिक बिरादार व उत्सव समिती परिश्रम घेत आहेत. नवरात्र प्रांरभी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात मंदीरात गर्दी केली होती.