जिजाऊ सृष्टी सिडकोच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य, खा.प्रताप पाटील चिखलीकर -NNL


नविन नांदेड| जिजाऊ सृष्टी साठी सर्वातोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कै.ईरबाजी हंबर्डे यांच्या प्रवेशद्वार कमानी शुभारंभ प्रसंगी केले, यावेळी मराठा समाजातील गरीब व प्रतिकुल परिस्थिती वर मात करून निट २०२२ परिक्षेत यश संपादन करणा-या ज्ञानेशवर जाधव यांच्ये अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

नांदेड वाघाळा शहर महानगर पालीकेचा  भाजपा नगरसेविका सौ.इंदुताई शिवाजीराव पा.घोगरे यांच्या स्वेच्छा निधीतून जिजाऊ सृष्टी सिडको येथे स्व.इरबाजी हंबर्डे प्रवेश व्दार कमान बांधकाम यासाठी  स्वेच्छा निधी अंतर्गत चार लक्ष रुपयांचा निधीतून प्रवेशव्दाराचे भुमीपूजन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिजाऊ सृष्टी येथे ११ सप्टेंबर कै. ईरबाजी हंबर्डे यांच्या नावाने  भव्य अशा प्रवेशद्वार कमानीचे भुमीपुजन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाले,  यावेळी कै.ईरबाजी हंबर्डे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून ऊपसिथीत मान्यवरांनी अभिवादन केले, सिडको भाजपाच्या प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेविका सौ इंदुबाई शिवाजीराव पाटील घोगरे यांच्या मनपा स्वेच्छा निधी अंतर्गत चार लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधी अंतर्गत प्रवेशद्वार कमान बांधकाम होणार असून 

यावेळी भाजयुमो शहर महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, नगरसेविका प्रतिनिधी जनार्दन गुपीले,सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, स्वाभिमानीचे माधव देवसरकर, संभाजी ब्रिगेड नांदेड लोकसभा मतदारसंघाचे  जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील, भाजयुमो सिडको शहर अध्यक्ष गजानन कते,धिरज स्वामी, संतोष गुट्टे,विठ्ठल घाटे,डॉ.विजयानंद भोंग,शैलेश करहाळे,संतोष हंबर्डे, मोहन पाटील घोगरे,व्हि.डी.बिरदार, त्र्यंबक कदम,दिलीप कदम,दिपक भरकड, विजयाताई गोडघोसे, गजानन लोंढे,सदाशिव कदम, अनिल पाटील,संग्राम मोरे,मंगेश कदम, मुन्ना शिंदे,वंसत कदम,गोविंद मजरे,दिलीप जाधव, उध्दव ढगे,अनिल हुंबाड, नामदेव चव्हाण, संजय जाधव यांच्या सह मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ बिग्रेड व  मराठा सेवासंघ सिडको हडको पदाधिकारी व महिला ,भाजपा  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम चे प्रास्ताविक साहेबराव गाढे,तर सुत्र संचालन दिंगाबर शिंदे यांनी केले.

मराठा समाजातील  गरीब कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ज्ञानेशवर प्रकाश जाधव यांनी निट परिक्षेत कोणतीही खाजगी शिकवणी न लावता घरीच अभ्यास करून ७२० पैकी ६२३ गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवल्या बद्दल भव्य अशा कमानीचे प्रवेशव्दार करणारे माळाकोळी येथील शिल्पकार मनोज भालेराव यांच्या खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी