नांदेड| एन.सी.एस.टी.सी.नेटवर्क नवी दिल्ली, जिज्ञासा ट्रस्ट ठाणे, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर.व जि. प. नांदेड यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२२ विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा दिनांक १३ सप्टेंबर रोजी सायन्स कॉलेज नांदेड येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
एन.सी.एस.टी.सी.नेटवर्क नवी दिल्ली आणि ठाणे येथील जिज्ञासा ट्रस्ट, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर, जि़प़नांदेड यांच्यातर्फे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२२ विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा १३ सप्टेंबर मंगळवारी सायन्स कॉलेज नांदेड येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून यावर्षीचा मुख्य विषय ‘आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे’ हा ठेवण्यात आलेला आहे.
यावेळी सदरील कार्यशाळेस शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी सलगर, बनसोडे, जिल्हा परिषद नांदेड व सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.डी.यू. गवई तसेच रवींद्र स्वामी जिल्हा समन्वयक राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद जिल्हा उस्मानाबाद हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षक कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद नांदेड चे जिल्हा समन्वयक जयराब अंबेकर विद्यालयाचे मुखाध्यापक सुभाष देगलूरकर व विज्ञान सल्लागार बाजगीरे यांनी केले आहे.
