९१ मुखेड विधानसभा मतदारसंघातील ३५७ मतदान केंद्रावर आधार जोडणी विशेष मोहीम -NNL

९१ - मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघात दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी ३५७ मतदान केंद्रावर मतदार यादीमधील तपशिलासी आधार जोडणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन -  तहसिलदार काशिनाथ पाटील

मुखेड, रणजित जामखेडकर| नांदेड जिल्ह्यात ९१ - मुखेड विधानसभा मतदारसंघाने ०१ लक्ष मतदारांच्या आधार क्रमांक जोडणीचा टप्पा पुर्ण केला. ९१-  मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघात दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर आधार जोडणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

 दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०. ते दुपारी ०४. या वेळात तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदान केंद्रावर उपस्थीत राहणार आहेत तरी आधार जोडणी न केलेल्या सर्व मतदारानी मतदार यादीशी - आधार क्रमांकाची जोडणी करुन प्रशासनास सहकाआर्य करावे असे आवाहन सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा मुखेडचे तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी केले आहे.

मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीतील नावाशी आधार कार्ड जोडणी करुन घ्या वी. या नोंदणी साठी Voter helpline app download करुन त्याव्दारे मतदार यादीतील तपशिलाशी आधार जोडणी करावी किंवा आपल्या केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्याशी संपर्क करावेत.   

 विधानसभा मतदार संघातील आजपर्यंत एकुण २,८९,११२ मतदारापैकी १,०३,९५० मतदारांची मतदान कार्डशी आधार जोडणी झाली असुन मतदारसंघातील एकुण ३५.९५ % मतदाराची आधार जोडणी पुर्ण झाली त्यापैकी मुखेड तालुक्यातील ३८० मतदान केंद्रावरील २,१९,०९४ मतदारापैकी ८४,९१९ व कंधार तालुक्यातील 77 मतदान केंद्राच्या ७०,०१८ मतदारापैकी  १९,०३१मतदाराची झाली आधार जोडणी पुर्ण झाली आहे.

आधार जोडणी कामाकरीता - मुखेड मतदारसंघात मुखेड तालुक्यात २८०  व कंधार तालुक्यात ७७ केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मेहनत घेत असुन मुखेड मतदार संघात ३५७ केंद्रातुन सर्वात प्रथम मतदान केंद्र क्र. १५३ कोळगाव, ३३५ गोजेगाव व १२३ वर्ताळ तांडा येथील BLO सौ.विद्या कांबळे, श्रीमती सविता स्वामी, श्री. गजानन पलकोंडवार यांनी १०० % आधार जोडणीचे काम पुर्ण केले आहेत. विशेषत: महीलानी १०० % काम करुन महीला पण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन काम करु शकतात हे दाखवुन दिले आहे. 

१०० % काम पुर्ण केलेल्या केंद्रस्तरीय अधिकारी यांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात प्रशस्तिपत्र देवुन सन्मान करण्यात येणार आहे. व अद्याप कामात प्रगती नाही अशा केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या विरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही प्रस्तावित केली जाणार आहे. आधार जोडणी कामासाठी २५ पर्यवेक्षक ३५७ बि.एल.ओ. व निवडणुक विभागाचे नायब तहसिलदार एस.एस.मामीलवाड, महसुल सहायक एस.आय.भुरे, डाटा एंन्ट्री आँपरेटर अत्तार बबलु मेहनत घेत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी