नांदेड। श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित सिडको येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.डॉ. रमेश नांदेडकर यांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बदल श्री. कालिका देवी मंदिर संस्थान द्वारा शिक्षक दिना निमित्त आयोजित कै.गंगाराम गोपाळराव पाटील (कोठावळे ) गुरुजी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार- २०२२ ने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण,सचिव डी.पी.सावंत, सचिव ॲड उदयराव निंबाळकर, कोष्याध्याक्ष प्रा.डॉ.रावसाहेब शेंदारकर, कार्यकारीणी सदस्य तथा उद्योजक नरेंद्र चव्हाण, प्राचार्य डॉ. राजेंद्र माळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक देवसरकर पर्यवेक्षक प्रा.चंदेल, प्रा.डॉ.बाबुराव घायाळ, प्रा.डॉ.गजानन पाटील, जे. ई. गुपीले, प्रा.डॉ.राहुल वाघमारे यांच्या सह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवरानी त्यांचे अभिनंदन केले आहे.