सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी पारितोषिक -NNL


नविन नांदेड।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी पारितोषिक ठेवण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोधदीन यांनी दिली.

 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या साठी ही स्पर्धा ठेवण्यात आली असून या साठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उत्सव स्थळ, नोंदणी केल्याबाबत तपशील, स्थानिक पोलीस स्टेशन परवानगी, पर्यावरण पुरक मुर्तीच्या तपशिल,सजावट,समाज प्रबोधन पर विषयावर संकल्पना, स्वातंत्र्य चळवळी संदर्भात देखावा, रक्तदान शिबीर , वैद्यकिय शिबीर तपशिल, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा शैक्षणिक कार्य बाबत अहवाल यासह महिला ग्रामीण भागातील वंचित यांच्या शैक्षणिक आरोग्य सामाजिक कार्याचा तपशिल पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा बाबत तपशिल, पारंपरिक देशि खेळ्या बाबतचा तपशिल आदी माहिती भरून द्यावयाची आहे.

यासाठी क्षेत्रीय कार्यालय सहा अंतर्गत अध्यक्ष म्हणून वैद्यकिय अधिकारी डॉ.अबदुल हमीद,सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त डॉ.रईसौधदीन ,सदस्य मुख्याध्यापक ,मनपा प्राथमिक शाळा किल्ला ईतवारा, सिडको स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अरजृन बागडी याची नियुक्ती करण्यात आली आहे.या स्पर्धा साठी प्रथम, व्दितीय, तृतीय पारितोषिक ठेवण्यात आले आहे, यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना सविस्तर फार्म देण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ.र ईसोधदीन यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी