शेकडो मुस्लिम बांधवाचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश -NNL


नविन नांदेड|
वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड दक्षिण महानगर च्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात शेकडो मुस्लिम तरुण बांधवांनी राज्य पक्षप्रवकते फारूक अहेमद व नांदेड महानगर दक्षिण अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांच्या ऊपसिथीत २ सप्टेंबर रोजी प्रवेश केला.

नांदेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २ सप्टेंबर रोजी पक्ष प्रवेश सोहळा  तहुरा बाग, गौसिया मशिद शिव रोड नांदेड ,येथे प्रभाग क्रमांक 27 मधील सामाजिक कार्यकर्ते लतीफ खान पठाण यांच्या सह, खडकपुरा, ताहूरबाग, बरकातपुरा,ईदगह, सैलाबनगर,माहेमूद फॅन्ग्सशनहॉल एरिया, येथे घेण्यात आला, यावेळी येथील शेकडो मुस्लिम बांधवानी वंचित बहुजन आघाडीत श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ते मा फारूक अहेमद यांच्या नेतृतवावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश प्रवक्ते फारूक अहेमद,तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिण महानगर चे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड ,नांदेड उत्तर महानगर अध्यक्ष आयुब खान,महानगर महासचिव अमृत नरंगलकर,युवा नेते सुदर्शन कांचनगिरे,महिला अध्यक्ष महानगर दक्षिण च्या संजना गायकवाड,ममता भद्रे,शहर उपाध्यक्ष राहुल गजभारे, वंचीत चे नेते मोहंमद कासीम भाई,युनूस खान,वाजीद खान शहजाद जाफरी,अब्दुस सामी, आदित्य देशमुख,एन सि एन चे ईशान खान अरबाज मुशरफ सह,प्रभागातील शेकडो युवक,जेष्ठ नागरिक, तसेच वंचित आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी इत्यादी उपस्तितीत होते.

यावेळी फारूक अहेमद,यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षांची व मुस्लिम समाजांनी वंचित सोबत का? राहावे यांचे सविस्तर मार्गदर्शन करताना केंद्र शासन, व राज्यशासन यांचे वाभाडे काढले व शेवटी वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याचे उपस्तितीतांना आहवान केले. यावेळी महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, आयुब खान, कासीम भाई, लतीफ खान आदीनी उपस्तितना मार्गदर्शनकेले या नंतर सर्व पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्ते यांना हार व वंचित बहुजन आघाडी ची दस्ती टाकून त्यांचा सत्कार करण्यात आला व सर्वाचे पक्ष प्रवेश केल्याचे अधिकृत घोषणा पक्षांचे महासचिव यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजहर शेख यांनी तर प्रास्तविक लतीफ खान व कासीम भाई यांनी केले, तरआभार प्रदर्शन नांदेड दक्षिण चे महासचिव अमृत नरंगलकर यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी