नवीन नांदेड| सिडको येथिल रमामाता चौक परिसरातील प्रदीप वाईन शॉप चे मॅनेजर माधव वाकोरे यांचा वाईन शाप सांगीतलेली बिअर का नाही असे साई इंगळे व अनोळखी इसमानी किरकोळ वादावरून दुकानांचा बाहेर बोलावून लाकडी बॅट व खंजरने वार करून खून केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी रात्री ९ चा सुमारास घडली असून घटनास्थळी खा, प्रतापराव पाटील चिखलीकर, पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,01 सप्टेंबर रोजी रात्री 08.30 चा सुमारास साई इंगळे हा प्रदीप वाईन शॉप या दारु विक्रीच्या दुकानामध्ये येवुन टुबर्ग कंपनीची बिअर मागीतली पंरतु ती उपलब्ध नसल्याने माझा ब्रॅन्ड कसा काय नाही, दुकान बंद करुन टाका अशी शिवीगाळ करुन साई इंगळे काय चीज आहे, थांब तुला दाखवितो, तुम्हाला दाखवितो अशी धमकी देवुन पुन्हा रात्री अंदाजे 09.30 वाजताचे सुमारास त्याचे सोबत इतर चार-पाच लोकांना लाकडी बॅट व खंजर या हत्यारासह घेवुन आला त्या सर्व लोकांनी दुकानातुन बाहेर येण्याची धमकी दिली त्यावेळी कोणीही बाहेर येत नसल्याचे पाहुन त्या लोकांनी जबरदस्तीने दुकानांमध्ये प्रवेश करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन, जिवे ठार मारण्याचे उददेशाने सुरवातीला मारहाण करुन माझा जिव घेण्याचा प्रयत्न केला.
मी कसा बसा त्यांच्या तावडीतून सुटून पुन्हा दुकानात आलो असता त्या लोकांनी पुन्हा दुकानात प्रवेश करुन मॅनेजर माधव जिवनराव वाकोरे यास बाहेर ओढुन त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन जिवे ठार मारण्याच्या उददेशाने खंजरने माघव जिवनराव वाकोरे यांचे मागच्या बाजुने उजवीकडील भकाळीमध्ये गंभीर वार करुन त्यांना जिवे ठार मारले. आमच्यावर हमला करण्यासाठी आलेल्या पम्या याचे पुर्ण नाव प्रेमसिंग सपुरे असल्याचे नंतर मला दवाखान्यामध्ये समजले वरून साई इंगळे, पम्या ऊर्फ प्रेमसिंग सपुरे व त्याचासोबतचे इतर तीन-चार अनोळखी इसमाविरूध्द फिर्याद दिल्यावरून वरुन गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा पोउपनि महेश कोरे यांनी दाखल केला आहे.
घटनास्थळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट देऊन पाहणी केली व या घटनेची सविस्तर माहिती घेतली तर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे, ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले उपनिरीक्षक अनिल बिचेवार यांच्या सह पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आरोपी चा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत,या घटने मुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी साईनाथ गुडमलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साई इंगळे,पम्या ऊर्फ प्रेमसिंग सपुरे यांच्या सह अन्य आरोपीवर कलम ३०२,३०७,४५२,२९४,३२३,५०४ ५०६ शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय पाटील हे करीत आहेत.