हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या गणपतीचे फुलांची उधळण करीत झाले विसर्जन -NNL

गणपती विसर्जन मिरवणुकीत फेटे बांधून हिंदू -मुस्लिम बांधव झाले होते सहभागी 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
यंदा हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या वतीने गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती. आज नवव्या दिवशी गणपती बाप्पाची विधीवत पुजा करून फुलांची उधळण करत भजनी मंडळाच्या गीतात शहरातील मुख्य रस्त्यानी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हिमायतनगर शहरातील हिंदू -मुस्लिम व सर्व धर्मीय बांधव सहभागी झाले होते. तीन तासाच्या शोभा यात्रेनंतर येथील श्री कनकेश्वर तलावाच्या नजीक असलेल्या विहिरीत श्रीचे जल्लोषपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. 


दोन वर्षाच्या कोरोणा महामारीनंतर यंदा गणपती बाप्पाच्या उत्सव धुमधडाक्यात साजरा होतो आहे. या उत्सवात सर्वच जण सामील झाल्याने यंदाचा गणेशोत्सव संबंध देशभरात हर्षोल्हासात होत असल्याचे दिसते आहे. त्याचं पार्श्वभूमीवर हिमायतनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांच्या नेतृत्वाखाली गणपती बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना दि.31 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. नित्यनेमाने आरती पूजा करत आज नवव्या दिवशी म्हणजे गुरुवार दि.08 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजता भजनी मंडळाच्या मधुर आवाजात अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.


त्यानंतर गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षै लवकर या... चा गजर व फुलांची उधळण करत शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शोभा यावी म्हणून पळसपूर येथील भजनी मंडळ संच आनंदोत्सवाट सहभागी होता. शहरात मिरवणूक येताच ठिकठिकाणी मिरवणुकीचे व गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. येथील पावनसुत हनुमान मंदिराजवळ नवप्राशनात गणेश मंडळाच्या वतीने फराळाची सोय करण्यात आली. येथील मंडळाच्या वतीने पोलीस अधीकारी - कर्मचाऱ्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच कालिंका मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या शिवशंकर गणेश मंडळाच्या वतीने पोलीस ठाण्यातील गणपतीचे स्वागत करून लाडूचे वितरण करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक निघाली यावेळी फटाक्याची आतिषबाजी करत अनेकांनी मिरवणुकीचे स्वागत केले. 


गणपती बाप्पाची मिरवणूक शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्यास श्री वरद विनायक मंदिरा नजीकच्या कनकेश्वर तलावात दाखल झाली. येथे श्रीचे मान्यवरांसह सर्व पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या हस्ते महाआरती करून प्रसाद वितरण करण्यात आला. यावेळी अनेकांनी विघ्नहर्त्या  गणरायाला दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढ... सर्वाना सुखी समृद्धी ठेव अशी कामना करत गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. आमचा गणपती चालला ना... पुढच्या वर्षी येईल ना....असे म्हणत गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देत श्रीच्या मूर्तीचे आनंदाने विसर्जन करण्यात आले. यावेळी परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रिश्रीमाळ, कृउबाचे माजी संचालक शेख रफीक सेठ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक स्मिता दिलीप जाधव, माजी जि. प. सदस्य समदखान पठाण, बजरंग दलाचे तालुका संयोजक गजानन चायल, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, 


रमेश अप्पा पळशीकर, कृउबाचे माजी सभापती गजानन तुप्तेवार, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे, जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड, गोशाळेचे संचालक किरण बिच्चेवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, गोविंद बंडेवार,  विठ्ठल पार्डीकर, बापूराव बोडावार, उदय देशपांडे, प्रकाश रामदिनवार, विलास वानखेडे, मुन्ना शिंदे, पत्रकार स. अ. मन्नान, नागोराव शिंदे, लक्ष्मण डांगे, पापा पार्डीकर, राम नरवाडे, अन्वर खान पठाण, जमादार अशोक शिंगणवाड, डिएसबीचे अविनाश कुलकर्णी, पोना. नागरगोजे, आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीस कर्मचारी व गणेशभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. 

शांततेत व शिस्तीत गणेश विसर्जन करा - सपोनि.बालाजी महाजन 


गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांनी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तासाठी रवाना होण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांनी पोलीस ठाण्याच्या वतीने काढण्यात आलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. तसेच पोलीस ठाण्याच्या वतीने जशी गुलाल विरहित, पर्यावरण पूरक, भजनी मंडळाच्या सानिध्यात मिरवणूक काढली. त्याचं प्रमाणे शहरातील सर्व गणेश मंडळांनी शांततेत व नियमाचे पालन करून शांततेत व शिस्तीत गणेश विसर्जन करावे असे आवाहन केले.  

वर्धमान मेन्स वेयरतर्फे थंड बबदाम लस्सीचे वितरण 


पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव मिरवणूक येणार असल्याचे समजल्यानंतर शहरातील प्रसिद्ध वर्धमान मेन्स वेयरचे संचालक आशिष जैन व सुमित जैन यांनी उमरखेड येथून थंड बदाम लस्सी मागविली. विसर्जन शांततेत झाल्यानंतर लस्सीचे वितरण करण्यात आले. वर्धमान मेन्स वेयरतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने गणेशेभक्तांचे स्वागत केले जाते यंदा पोलीस प्रश्नाच्या मिरवणुकीत सामील झालेल्या सर्वाना लस्सीचे वितरण केले त्याबद्दल सर्वानी आभार मानले.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी