सहयोग कॅम्पस नांदेड येथे लातूर विभागाची अध्यापक विद्यालय प्राचार्य आढावा बैठक व कार्यशाळा उत्साहात संपन्न..
नविन नांदेड| लातूर उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील अध्यापक विद्यालय प्राचार्यांची द्विमासिक आढावा बैठक व कार्यशाळा सहयोग सेवाभावी संस्था संचालित अद्यापक विद्यालय, विष्णुपुरी, नांदेड येथे उत्साहात संपन्न झाली. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे हे होते तर सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.संतुकराव हंबर्डे,लातूर उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.दत्तात्रय मठपती,उस्मानाबाद डायट प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे,नांदेड डायट प्राचार्य डॉ.रवींद्र आंबेकर,शासकीय अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य तथा लातूर डाएट प्रतिनिधी डॉ.राजेश गोरे, जि प नांदेड उपशिक्षण अधिकारी श्री सलगर नांदेड, नांदेड डायट चे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ शिवाजी साखरे, सहयोग सेवाभावी संस्था संचालित अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी गिरगांवकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.या बैठकीचे व कार्यशाळेचे आयोजन नांदेड येथील सहयोग सेवाभावी संस्थेचे अध्यापक विद्यालय येथे करण्यात आले होते.
पुढे बोलताना लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे म्हणाले की, डी.एल.एड.अभ्यासक्रम शिकवत असताना अध्यापकांनी अद्ययावत ज्ञान प्राप्त केले पाहिजे त्यासोबतच आपल्या लातूर विभागाचे विद्यार्थी हे महाराष्ट्रात टीईटी परीक्षेत राज्यात अव्वल राहतील असा आशावाद यावेळी व्यक्त केला तसेच टीईटी सराव परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या चुका लक्षात येतात आणि पुढील परीक्षेमध्ये तो चुका करत नाही त्यामुळे विद्यार्थी प्रत्येक सराव परीक्षेला बसला पाहिजे याची दक्षता देखील प्राचार्यांनी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी केले यात विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी घेण्यात येणाऱ्या सराव टी इ टी परीक्षा बद्दल मोरे अभिनंदन केले तसेच दुर्लक्षित अद्यापक विद्यांलयाच्या गुणवत्ता वाढीसाठी आपल्या दैनंदिन प्रशासन कार्यालयातून वेळ कडून अद्यापक विद्यालयांच्या प्रवेश व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत याबद्दल त्यांचे सर्व संस्थाचालकांच्या वतीने अभिनंदन केले व आमच्या संस्थेचा नावातच सहयोग असून आपल्या या स्तुत्य कार्यात आमची संस्था आपल्याला सर्व परीने सहयोग करेल असे आश्वासन दिले.
यावेळी उस्मानाबाद डाएटचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनूरे यांनीही आपल्या भाषणामध्ये चांगल्या शिक्षकांची गरज भासणार असून ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू,डीएडच्या विद्यार्थ्यांना नवनवीन अनुभव देण्यासाठी तो प्रत्यक्ष शाळेत आंतरवासिता व अध्यापना करिता गेला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.तर लातूर उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.दत्तात्रय मठपती,नांदेड डायटचे प्राचार्य डॉ.रवींद्र आंबेकर,शासकीय अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य तथा लातूर डाएट प्रतिनिधी डॉ.राजेश गोरे,लातूर उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.दत्तात्रय मठपती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नांदेड डायटचे प्राचार्य डॉ.रवींद्र आंबेकर, यांचा नियत वयोमानानुसार सेवा निवृत्ती बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर विभाग लातूर च्या वतीने व सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डी.एल.एड.अभ्यासक्रमात तीनही डायट अंतर्गत येणाऱ्या तज्ज्ञ अध्यापक यांचे मार्गदर्शन झाले. यामध्ये रेणुका अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य शशिकांत चिल्लर्गे, श्री तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे प्रा.विवेक कोरे,शिरूर ताजबंद येथील मोहनराव पाटील अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य यादव कर्डिले,उदगीर शासकीय अध्यापक विद्यालयाचे डॉ.राजेश गोरे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.
ही बैठक व कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर संजय पुरी व सहयोग सेवाभावी संस्थेच्या अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.बालाजी गिरगावकर, प्राचार्य विश्वनाथ भरकड, प्राचार्य पुंडलिक वानखेडे, प्राचार्य शिवानंद बारसे, संचालक सुनील हंबर्डे , प्राचार्य सुनील पांचाळ, प्राचार्य डॉ. गजाला खान, प्रशासकीय अधिकारी श्री विश्वनाथ स्वामी, प्रा. अनिल सोनटक्के, प्रा. डॉ. पंचलिंग एस के, प्रा.अशोक मेटकर प्रा.वैशाली मठपती, प्रा.मीरा झुंजारे , प्रा.अश्विनी गजभारे प्रा.डॉ. किशोरकुमार कुलकर्णी ग्रंथपाल लोखंडे किरण, राजेश हंबर्डे, अनुरथ हिवंत, बालाजी किरकण, मारोती मोरे, धारोजी हातागळे रामा लुटे, धोंडिबा वाघमारे व त्यांचे सर्व सहकारी अध्यापक वर्ग यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्राचार्य डॉ. बालाजी गिरगांवकर, तर आभार प्रदर्शन डॉ. पंचलिंग एस. के. यांनी केले.