लोहा| तालुक्यातील खडक मांजरी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी पॅनल ने १३ पैकी १२ जागा जिकल्या चेअरमन म्हणून नागोराव पाटील कापसे यांची तर व्हॉईस चेअरमनपदी सुनील एडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
खडक मांजरी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत दीर्घकाळ चेअरमन राहिलेले खुशाल पाटील होळगे यांचे पॅनल पराभूत झाले.पण ते स्वतः बिनविरोध निवडून आले. तर शेतकरी पॅनेल चा एकहाती विजय झाला. नागोराव पाटील कापसे हे चेअरमन म्हणून तर सुनील एडके यांची व्हॉईस चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. एस. चिल्ले तर सहाय्यक अधिकारी म्हणून माधव कांबळे होते.
सेवा सहकारी सोसायटी संचालक गंगाधर कापसे, देविदास कापसे, बालाजी कापसे, बालाजी कापसे, मोतीराम कापसे, विश्वनाथ बडवणे, वसंताबई कापसे, ज्योतिबाई वाघमारे, परमेश्वर वाघमारे, मोतीराम पवार आदीची हजेरी होती. यशस्वीतेसाठी सरपंच चांदोबा कापसे, उपसरपंच संतोष वाघमारे, माजी सरपंच पांडूरंग चौगुले, माजी सरपंच मोतीराम दरेगावे, माजी सरपंच श्याम वाघमारे, परिवर्तनाची हाक देणारे विठ्ठल वारकड, रमेश पाटील कापसे, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.