रांगोळीतील बाप्पाला पाहण्यासाठी चिमुकल्या बालकांची गर्दी
हिमायतनगर, अनिल मादसवार| सर्वत्र गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला जात आहे, त्याचं पार्श्वभूमीवर आंदेगाव येथील एका विद्यार्थिनीने चक्क रांगोळीतून गणपती बाप्पाचे चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ग्रामीण भागातील कु.द्वारका या विद्यार्थिनीने साकारलेली गणपती बाप्पाच्या रांगोळीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
वर्षातून एका वेळा येणाऱ्या गणपती बाप्पाचा सण म्हंटले कि सर्वासाठी आनंदाची पर्वणी असते सर्व -काम धाम सोडून लहान थोर मंडळी देखील गणपतीच्या उत्सवात दंग होतात. असाच कांहींसा अनुभव हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथील सुब्बनवाड कुटुंबातील सदस्यांच्या हातातील जादुई कला पाहून सर्वाना येतो आहे. तसे नारायणराव सुब्बनवाड याना लहानपणीपासून गणपती मूर्ती करण्याचा छंद आहे. या छंदाला त्यांनी व्यवसायाची जोड देऊन ना नफा... ना तोटा... या उद्देशातून दरवर्षी गणेशमूर्त्यासह दुर्गा मुर्त्या तयार करून परिसरातील भाविकांना पुरवितात. त्यांच्या हाताची कला पाहून आजघडीला येथील मुर्त्या खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही आवर्जून येतात.
त्यांच्या छंद पाहून घरातील सर्व कुटुंबीय त्यांना या कमी सहकार्य करतात. वडीलानी जोपासलेल्या मुर्त्यां बनविण्याचा छंद पाहून त्यांची मुलगी कु.द्वारका हिने सुद्धा रांगोळीतून अप्रतिम कला जोपासली आहे. त्यांनी दरवर्षीप्रमाणे गणरायाची स्थापना घरी केली असून, गणपती बाप्पासमोर आकर्षक अशी आरास करून सजावट देखील केली असल्याने गावातील प्रत्येक नागरिक गणपतीच्या दर्शनासह कु. द्वारका हिने रांगोळीतून केलेल्या गणपतीचा देखावा पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत.
तिच्या हातातही अप्रतिम कला गुण असल्याने सण - उत्सव आणि महापुरुषांच्या जयंत्यासह देवी देवतांचे रांगोळीतून सगुण रूप साकारण्याचा छंद जोपासते आहे. कु.द्वारका रांगोळी काढत आहे म्हंटल कि आजूबाजूचे लहान बालके देखील हे पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करत असतात. गणेशोत्सव सुरु झाल्यापासून दररोज आरतीपूर्वी गणपती बाप्पाच्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळीची आरास काढून गावातील लोकांना आकर्षित करते आहे. आज तर चक्क कु.द्वारकाने रांगोळीतून गणपती बाप्पाचे सांगून रूप साकारले आहे. गणपतीच्या या रांगोळीला पाहून अनेकांनी तिच्या कलेचे कौतुक केले असून, येथील व्यसनमुक्तीचे प्रचारक विठ्ठलराव देशमवाड यांनी तर कु.द्वारकाने वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या रांगोळी स्पर्धंमध्ये सहभाग घ्यायला हवा अशी भावना व्यक्त केली आहे.