कायदा व सुव्यस्थेचे पालन करून शांततेत उत्सव साजरे करण्याचे आवाहन
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील २० गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविन्यात आली आहे. हि बाब हिमायतनगर तालुक्यासाठी भुशनावह असून, याचा आदर्श सर्व गावातील नागरिकांनी घेवून पुढील वर्षी जास्तीत जास्त गावकर्यांनी लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला एकसंघतेचा उद्देश सफल करावा. असे आवाहन पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांनी केले. ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना बोलत होते.
गणेश चतुर्थी मुहूर्तापासून गणेशोत्सवाची धूम सुरु झाली असून, धार्मिक सन - उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जवळपास ९१ ठिकाणी गणपती स्थापन केलेल्या मंडळाच्या भेटी घेऊन तसेच पोलीस स्थानकात शांतता कमिटीच्या बैठक घेऊन शांततेत उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील हिंदू - मुस्लिम एकतेची परंपरा गेल्या ५२ वर्षांपासून कायम असून, सामाजिक शांतता व बंधुभावाची परंपरा जोपासत सन- उत्सव साजरे केली जातात. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येउन उत्सव साजरे करतात याची मला जान आहे.
दरवर्षी दुष्काळ परिस्थिती वाढतच आहे, या काळात सन उत्सव सार्वजनिक रित्या आणि एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवून साजरे करने आणि विशेषतः पर्यावरण पुरक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाने डीजे, डॉल्बी सिस्टीम, कर्णकर्कश आवाजावर बंदी घातलेली आहे. केवळ ७५ डिसेबल पर्यंतच्या आवाजाला परवानगी असल्यामुळे मंडळांनी कमी आवाजाचा भोंगा वापरून धार्मिक गीतातून उत्सव साजरा करावा. जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. यामुळे ध्वनीप्रदूषण होऊन दुसर्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अश्या सूचना दिल्या आहेत.
तसेच हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून ९१ गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. आमच्याकडे परवान्यासाठी अनेकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी पिंपरी, खैरगाव तांडा, ताडाची वाडी, भिश्याची वाडी, डोल्हारी, सिरपल्ली, वारंगटाकळी, धानोरा, सिबदरा, खैरगाव, वाशी, पार्डी, दिघी, वाघी, आदीसह २० गावात एक गाव एक गणपती तर इतर गावात ४३ अशी एकूण ६३ गणेशाची ग्रामीण भागात स्थापना झाली आहे. तसेच हिमायतनगर सारख्या एकट्या शहरात जवळपास २४ ठिकाणी मुर्त्या स्थापन करण्यात आल्या असून, त्यापैकी १४ गणेश मंडळाने परवान्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. तर १४ विना परवाना मुर्त्यांची स्थापना झाली असून, त्यांनी सुद्धा तात्काळ परवानग्या घेऊन आनंदाने उत्सव साजरा करावा. उर्वरित मंडळांनी परवानग्या घेतल्यास गणेश मंडळाची संख्या कमी -अधिक होईल अशी माहिती डीएसबीचे अविनाश श्यामसुंदर कुलकर्णी यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेत गणेशोत्सव पार पडावा म्हणून पोलिस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक स्मिता दिलीप जाधव, २५ पोलीस कर्मचारी, २० होमगार्ड, ५ नवप्रशिक्षणार्थी, आदी ५० हून अधिक पोलिसांचे शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचालन (रूट मार्च) करण्यात आले. आत्ता पर्यंत गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून ५ व्या दिवशी १ गणेश मंडळ, ७ व्य दिवशी ३ गणेश मंडळ, नावाव्य दिवशी १० आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला उर्वरित गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.