नांदेड। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांचे निवडणूक ओळखपत्रास आधार लिंक करावयाचे काम जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरात विशेष शिबिरे मोहिमा घेऊन, घरोघरी भेटी देऊन आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्राशी लिंक करावयाचे कामकाज सुरू आहे.
तथापि नांदेड तालुक्यातील लिंबगाव मतदान केंद्र क्र 170 चे बिएलओ कदम उद्धव रंगनाथराव सहशिक्षक सहकार महर्षी पद्मश्री शामरावजी कदम प्रा.शाळा लिंबगाव यांनी विहित वेळेत आपले कामकाज पुर्ण केले त्यानिमित्ताने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी,नायब तहसीलदार ऊर्मिला कुलकर्णी यांचे सह मंडळ अधिकारी शिंदे , पर्यवेक्षक मोरे ,सय्यद नबी , महसूल सहायक अनुसया नरवाडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कदम यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करत आपण केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बिएलओचे आधार लिंकीग चे काम पुर्ण केले यासाठी सर्व मतदारांशी माझा नित्य संपर्क असल्याने,त्यांचे मोबाईल नंबर माझेकडे असल्याने हे काम करणे मला सहज शक्य झाले असे सांगितले.
मतदारांनी स्वतः आपल्या अंड्राॅईड फोन मध्ये वोटर हेल्पलाईन अॅप डाउनलोड करून आपले आधार लिंक करावे किंवा सर्व संबंधित बिएलओ यांना आपला आधार क्रमांक लिंक करणेसाठी सहाय्य करावे असे आवाहन निवडणूक विभाग नांदेड च्या वतीने करण्यात आले आहे.